सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- शहरातील विकास कामाबाबत आढावा बैठक (दि.१७) ला नागार्जुन विश्रामगृह रामटेक येथे राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षेखाली घेण्यात आली. सदर बैठकीत गडमंदिर, अंबाळा, नेहरु मैदान येथील विकास कामे व रामटेक शहरातील अनेक मंजूर कामाबाबत आढावा घेण्यात आला. मंजूर आसलेल्या कामांची तात्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे सुरु करण्याचे तसेच प्रगतीपथावरील कामे उत्तम दर्जाची करण्याबाबत कंत्राटदार यांना ना. जयस्वाल यांनी रामटेक शहरातील विकास कामाबाबत आढावा घेऊन त्यांना गती देण्याचे यावेळी उपविभागीय अधिकारी प्रयेश महाजन यांना सांगितले. राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांसोबत गडमंदिर, अंबाळा व शहरातील विविध विकास कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन कामांचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रयेश महाजन,तहसिलदार पुनम कदम,उपविभागीय पोलिस अधिकारी बरकते, गट विकास अधिकारी जयसिंग जाधव,सार्वजानिक बांधकाम विभागाचे किरण पोकळे, मुख्याधिकारी नितिन लुंगे, वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत, विद्युत विभागाचे अभियंता गिरीश मडामे, पुरातत्व विभागाचे मयुरेश खडके, निरज तिवारी,पोलिस निरीक्षक शेटे,शिवसेना रामटेक शहर प्रमुख राजेश किंमतकर, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, माजी सभापती बिकेंद्र महाजन, युवासेना उप जिल्हाप्रमुख कमलेश शरणागत, गौरव पनवेलकर यावेळी उपस्थित होते...
