श्रवण कदम स्पर्धेचा मानकरी, तर लहान गटात तनुजा जाधव प्रथम
रोहेकरांनी केले डॉ. सी. डी. देशमुखांच्या कार्यावर विचारमंथन
रोहा प्रतिनिधी ;- संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देणारे रोहयाचे सुपुत्र स्व. डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त तालुक्यातील विविध युवक संस्थांच्या सहभागातुन रोहयात आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत युवा शक्तीने विविध विषयांवरिल परखड मतप्रदर्शना बरोबरच डॉ. सी. डी. देशमुखांच्या अजरामर कार्याची उजळणी केली... यावेळी युवा शक्तीकडून होणारे विचारमंथन ऐकण्यासाठी रोहेकरांनी ऐतिहासिक राममारुती चौकात गर्दी केली होती....
रोहा तालुक्यातील सुराज्य प्रतिष्ठान, अभिनव रोहा, शिवचरण मित्रमंडळ, स्पंदन नाट्य संस्था, मावळा प्रतिष्ठान, राजमुद्रा फौंडेशन, श्रीकृपा फाउंडेशन, रोटरी क्लब, रोट्रैक क्लब, रोहा युवा आदी युवा संस्थांच्या सहयोगातुंन रोहा प्रेस क्लब आणि रोहा तालुका युथ फोरमच्या वतीने ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती...
स्पर्धेत खुल्या गटात श्रवण वामन कदम प्रथम, सूरज म्हशिलकर द्वितीय, आदिती थिटे, बाहे तृतीय, रोहन देशमुख याने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले....
लहान गटात तनुजा निलेश जाधव, बाहे प्रथम, कस्तुरी मनोज सुटे, चिल्हे हायस्कूल द्वितीय, आस्था विनोद थिटे तृतीय आणि पुर्वा गणेश मोहिते धाटाव हायस्कूल हिने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले...
अल्पावधित आयोजन करण्यात आलेल्या या स्पर्धेत स्पर्धकांनी उत्साही सहभाग नोंदविला. प्राध्यापक टी. पी. मोकल आणि विचारवंत अमित गुजर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ वत्सराज सर, रोहा सिटिझन फोरमचे निमंत्रक आप्पा देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरीवले, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, गडदुर्ग अभ्यासक सुखद राणे, सामाजिक कार्यकर्ते मकरंद बारटके, रोशन चाफेकर, हर्षद साळवी, अमित कासट, विनीत वाकडे आदींच्या हस्ते करण्यात आले...
या वक्तृत्त्व स्पर्धेंचे आयोजन करून युवकांच्या संवेदनांना वैचारिक दिशा देण्याचे काम केले असून यामुळे युवकांना व्यक्त होण्यासाठी सध्याच्या समाजमाध्यमांच्या पेक्षाही अधिक परिणामकारक माध्यम उपलब्ध झाले आहे, अशा वक्तृत्व स्पर्धांतून व्यक्तिमत्त्व विकासाची जडणघडण होते, त्यासाठी अशा स्पर्धा भरविल्या गेल्या पाहिजेत, ते कृतीशील काम रोहा प्रेस क्लब, युथ फोरमच्या व अनेक सहयोगी संस्थां करीत आहेत असे स्पर्धा समितीचे राजेंद्र जाधव यांनी आपल्या प्रस्ताविकात स्पष्ट केले. यावेळी सुराज्य संस्थेचे रोषण चाफेकर, अभिनव रोहाचे हर्षद साळवी या युवा वक्त्यांनी विचार मांडले.... स्पर्धेत युवा शक्तीने विविध विषयांवरिल परखड मतप्रदर्शन केले. संदीप सरफळे आणि निनाद शिंदे यांनी सूत्रसंचालन केले...
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोहा प्रेस क्लब उपाध्यक्ष नंदकुमार मरवडे, उद्धव आव्हाड, सरचिटणिस विश्वजित लुमन, संघटक रविंद्र कान्हेकर, खजिनदार संदीप सरफळे, सल्लागार नरेश कुशवाह, अंजुम शेटे, समिधा अष्टीवकर, संतोष सातपुते, शरद जाधव, पराग फुकणे, केशव म्हस्के, सागर जैन, दिनेश जाधव, नंदकुमार बामुगडे, जितेंद्र जाधव, कल्पेश पवार, नंदकुमार बामुगडे आदींनी परिश्रम घेतले...
