महाराष्ट्र वेदभुमी

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 3 जण जागीच ठार, 14जण जखमी.



लक्झरी बस व कंटेनरचा मुंबई-नाशिक रोडवर अपघात 

मुलुंड प्रतिनिधी: सतिश वि.पाटील 

मुंबई-नाशिक महामार्गावर बुधवारी पहाटे एक भीषण रस्ता अपघात झाला, ज्यामुळे तीन जणांचा मृत्यू झालाय आणि 14 जण जखमी झालेत....ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील गोटेघरजवळ ही घटना घडलीय....हा अपघात पहाटे 4:00 वाजता झाला...

नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या दोन वाहनांना आणि उभ्या असलेल्या लक्झरी बसला धडक दिली....

स्थानिक शाहपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रहिवाशांच्या मदतीने 14 जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले...यावेळी तीन जणांना वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मृत घोषित केले...तर जखमींपैकी आठ जण गंभीर जखमी झाले आहेत...

   अधिकाऱ्यांनी वाहने सोडेपर्यंत महामार्गावरील वाहतूक तात्पुरती विस्कळीत झाली होती...कंटेनरचे नियंत्रण सुटण्यामागचे कारण शोधण्यासाठी शहापूर पोलीस सध्या घटनेचा अधिक तपास करीत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post