चोंढी येथील किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्याकडून कु.स्वाहा हीचा सत्कार,
सोगाव - अब्दुल सोगावकर :अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील कु. स्वाहा सानिका निलेश कदम या अवघ्या दहा वर्षाच्या मुलीने लखनऊ येथे झालेल्या १४ आणि १५ व्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत (एफएएआय नॅशनल फिल्ड इनडोअर आरचेरी चॅम्पियनशिप) २०२४-२५ मध्ये मुलींच्या अंडर - १० गटामध्ये वैयक्तिक रौप्य पदक आणि सांघिक सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी आपल्या मित्रपरिवारांसह तिच्या निवासस्थानी जाऊन जाहीर सत्कार केला...
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आदी क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या आपल्या परिसरातील प्रत्येकाचे कौतुक व यथोचित सन्मान करत त्यांना प्रोत्साहन देणारे सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी कु. स्वाहा सानिका निलेश कदम हिने लखनऊ येथे झालेल्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत रौप्य पदक व सांघिक सुवर्णपदक मिळविल्याबद्दल गुरुवार दि. ९ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी तिच्या चोंढी येथील निवासस्थानी जाऊन जाहीर सत्कार करत पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या...
यावेळी सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या सोबत त्यांचे मित्रपरिवार तसेच कु. स्वाहा कदम हिची आई सानिका कदम तर वडील निलेश कदम उपस्थित होते...
फोटो लाईन :राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत रौप्य पदक व सांघिक सुवर्णपदक मिळविल्याबद्दल कु. स्वाहा निलेश कदम हिचा सत्कार करताना किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व उपस्थित कु. स्वाहा चे आई, वडील,
