महाराष्ट्र वेदभुमी

विज्ञान विषयक एक दिवशीय कार्यशाळा

 


सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रविनगर नागपूर द्वारा आयोजित अगस्त्या फाऊंडेशन बंगलोर तर्फे तालुक्यातील मारोडी येथील ग्रामविकास अध्यापक विद्यालयातील प्रशिक्षणार्थींसाठी खेळातून विज्ञान या  एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन दि. १४ जानेवरी रोजी करण्यात आले...

कार्यशाळेत अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशनचे विभागीय को- अर्डिनेटर राजेश लोखंडे व प्रिती तांडेकर यांनी विज्ञानातील वेगवेगळ्या प्रयोग खेळाच्या माध्यमातून सांगितले... हवेचा दाब, क्षितीज उर्जा, न्यूटनचे वेगवेगळे सिध्दांत, विविध मनोरंजक खेळ, गणितातील भूमितीच्या आकृत्या, घड्याळाच्या फिरत्या काट्यांमुळे निर्माण होणारे विविध कोन  याबाबत मार्गदर्शन करण्यात आले...

यावेळी अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या मंजुषा व्ही. ठवकर, प्रा. खुमेंद्र रहांगडाले, पिंटू मोहतुरे, पुष्पल‌ता बोरीकर निरूशा ठवकर, तसेच लिपिक रामचंद्र सिंगनजुडे व संस्था सदस्य अशोक सिंगनजुडे उपास्थित होते... आयोजनासाठी शंकरजी तुमसरे यांनी सहकार्य केले... विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला...

Post a Comment

Previous Post Next Post