शहानवाज मुकादम/रोहा
मुरुड: 19 डिसेंबर 2024 रोजी मुरूड शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये उमेश गोबरे यांच्या इमारतीला फार मोठी आग लागली आणि त्यामध्ये त्यांचे घर आगिच्या भक्ष्य स्थानी पडुन फार मोठे आर्थिक नुकसान झाले होते. उमेश गोबरे हे घरी नसताना लागलेले हि आग म्हणजे त्यांना एक फार मोठा मानसिक धक्काच बसलाहोता. उमेश गोबरे यांचे यामध्ये प्रचंड नुकसान झाले होते...
आज मकर संक्रांतीचे अवचित्य साधून महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था ली. मुरुड यांनी आपला खारीचा वाटा समजून गोबरे कुटुंबीयांना माणुसकीच्या नात्याने आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला...
महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था ही सामाजिक बांधीलकी जपणारी मुरुड मधील एक विश्वसनीय संस्था आहे. आर्थिक मदत करून या संस्थेने एक सामाजिक आदर्श घालून दिलेला आहे. संस्थेचे अध्यक्ष अजित गुरव यांनी याप्रसंगी सांगितले की महात्मा फुले पतसंस्था हि एक कुटुंब म्हणून काम करते आणि त्या कुटुंबाचे उमेश गोबरे एक सदस्य आहेत.आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीचे किंवा सदस्याचे झालेले नुकसान हे कधी भरून न येणारे आहे. त्यामुळे थोडकं का होईना पतसंस्थेकडून आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने आज ही मदत करण्यात आलेली आहे. यासाठी संपूर्ण कार्यकारी मंडळाने सहकार्य केले आहे. या मदतीबाबतीत उमेश गोबरे व त्यांच्या कोणत्याही कुटुंबीयांनी मदतीसाठी कोणतीही अपेक्षा व्यक्त केलेली नाही. ही मदत संस्थेने मानवतेच्या द्रुष्टीकोनातून केलेली आहे. यावेळी आर्थिक मदतीचा 15 हजार रुपयांचा चेक अध्यक्ष अजित गुरव यांनी गोबरे कुटुंबियांकडे सुपूर्द केला आहे.संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती अनघा चौलकर यांनी मदत स्विकारल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक आदेश दांडेकर, सायली गुंजाळ मॅडम, महेंद्र पाटील , राहुल वर्तक , उमेश अपराध तसेच पतसंस्थेचे व्यवस्थापक राकेश मसाल, कर्मचारी श्रीयुत योगेश अपराध, प्रथमेश भगत व विशाल वीरकूड इत्यादी उपस्थित होते...
