महाराष्ट्र वेदभुमी

कोलाड पोलिस ठाण्यासमोर गतिरोधकांना पांढरे पट्टे नाही; प्रवाश्यांच्या जिवाला धोका.


कोलाड (श्याम लोखंडे ) मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड पोलिस ठाण्यासमोर तसेच कोलाड रेल्वे ब्रिज खाली  रस्त्याला गतिरोधक बसविण्यात आलेले आहेत.परंतु या गतिरोधकांना पांढरे पट्टे न बसविल्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे...

मुंबई-गोवा महामार्गांवरील मुंबई बाजु कडून कोलाड बाजूकडे जाणाऱ्या कुंडलिका नदी पासुन कोलाड रेल्वे ब्रिज पर्यंत एका बाजूचा सिमेंट काँक्रेटच्या रस्त्याचे काम काही दिवसापूर्वी पूर्ण झाले आहे.यामुळे येणारी जाणारी वाहतूक या महामार्गाने वळविण्यात आली आहे. या मार्गालगत रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा, कोलाड हायस्कूल, कोलाड पोलिस ठाणे, कोलाड बाजारपेठ, प्राथमिक आरोग्य केंद्र,असल्यामुळे या मार्गानी खांब कोलाड परिसरातील असंख्य नागरिक,रुग्ण,विद्यार्थी येजा करीत असतात..           

शिवाय हा मार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गांवर  असल्यामुळे या महामार्गनी छोट्या-मोठया वाहनांची सतत वर्दळ सुरु असते...यामुळे वाहनांचा वेग कमी करण्यासाठी कोलाड पोलिस ठाण्यासमोर तसेच कोलाड रेल्वे ब्रिज खाली रस्त्याला गतिरोधक बसविण्यात आले आहे...परंतु गतिरोधकाला पांढरे पट्टे लावण्यात आले नाहीत यामुळे या महामार्गांवरून येजा करणाऱ्या वाहन चालकांना  हे गतिरोधक दिसत  नसल्याने  वाहनचालकांचा वेगावर नियंत्रण राहत नाही...

यामुळे येथे अपघाताच्या घटना घडत असुन दोन दिवसापूर्वी एक महिला टुव्हीलरवरून पडून जखमी झाली... गतिरोधकाला पांढरे पट्टे न लावल्यामुळे तसेच  रात्रीच्या वेळी रस्त्याला पथदिवे नसल्यामुळे हे गतिरोधक वाहनचालकांच्या लक्षात येत नाही यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे....

कोड

मुंबई गोवा महामार्गाचे काम खांब कोलाड दरम्यान सुरू आहे तर कोलाड पोलिस ठाण्यात समोर नजीकच्या मार्गावर भले मोठे गतिरोधक बनविण्यात आले असून त्यावर पांढरे पिवळे पट्टे नसल्याने दुचाकी वाहने घसरून पडत असल्याची घटना घडत आहेत त्यामुळे या ठिकाणी संबधीत खात्याने याकडे लक्ष केंद्रित करून हे पट्टे मारण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.. दिनकर सानप सामाजिक कार्यकर्ते कोला

Post a Comment

Previous Post Next Post