महाराष्ट्र वेदभुमी

शाब्बास पोरा! वडील गवंडी कामगार, लेकरांची ITBP मध्ये निवड


नेचर फाउंडेशन कडून जल्लोषात सत्कार

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- हिवरा-हिवरी येथिल गवंडी म्हणून काम करणाऱ्या सीताराम गायकवाड यांच्या ताजुल व ज्योती दोन्ही भावंडांनी एसएससी जीडी यातील आयटीबीपी या पदाकरीता निवड झाली...अन गावाच्या इतिहासात आपले नावं कोरलं...या दोन्ही भावंडांचे नेचर फाउंडेशन क्लासमध्ये विद्यार्थी,शिक्षक यांनी गुलाल,बुके व हार घालून मोठ्या उत्साहात जल्लोषात सत्कार करण्यात आला...

       नेचर फाउंडेशन द्वारा रामटेक येथे गेल्या एक वर्षापासून मोफत शिकवणी वर्ग व अभ्यासिका  चालविल्या जाते, या अभ्यासिकेमध्ये रामटेक सभोवताल असणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षण शिकवणी वर्गात शिक्षण घेत असतात... या विद्यार्थ्यांना नेचर फाउंडेशनचे  निलेश नन्नावरे सकाळी दोन तास कोणतेही शुल्क न घेता विद्यार्थ्यांना शिकवीत असतात या शिकवणीच्या वर्गातील ताजुल गायकवाड व ज्योती गायकवाड हे दोघेही भाऊ-बहीण एसएससी जीडी चा अभ्यास गेल्या एक वर्षापासून करत होते... या दोन्ही भावंडांनी एकत्रच परीक्षा दिले आणि त्या परीक्षेत या दोघांची आयटीबीपी (ITBP) या पदासाठी निवड झाली...

     रामटेक तालुका ग्रामीण व शहरातील विद्यार्थ्यांकरिता अजून एकही अभ्यासिका या ठिकाणी उपलब्ध नव्हती तसेच स्पर्धा परीक्षा मोफत शिकवणी वर्ग सुद्धा उपलब्ध नाही... यांचे गांभीर्य लक्षात घेऊन नेचर फाउंडेशन नागपूर द्वारा रामटेक येथे गेल्या एक वर्षापासून मोफत अभ्यासिका व शिकवणी वर्ग चालवण्यात येत आहे...याची प्रचीती म्हणजे या दोन्ही भावंडांची झालेली निवड झाली आहे...

"स्पर्धा परीक्षा व देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शैक्षणिक क्षेत्रात रामटेक तालुक्याला हब बनविण्यासाठी नेचर फाउंडेशन प्रयत्नशील राहील"-निलेश नन्नावरे (संस्थापक नेचर फाउंडेशन)

Post a Comment

Previous Post Next Post