महाराष्ट्र वेदभुमी

करंजाडे सेक्टर 3 परिसरात आढळला मृतदेह

 


पनवेल प्रतिनिधी : पनवेलजवळील करंजाडे सेक्टर 3 येथील साईटवर एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत...

सदर इसमाचे अंदाजे वय 40 वर्षे, डोक्याचे केस काळे पांढरे, दाढी मिशी वाढलेली, बांधा सडपातळ, उंची 5 फुट असून, अंगात पिवळ्या रंगाचा हाफ टी शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे... या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी 022-27452333 किंवा सहा.पो.नि.सारिका झांझुर्णे यांच्याशी संपर्क साधावा...

Post a Comment

Previous Post Next Post