तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत त्रिनेत्र बावनकर प्रथम
'चंद्रयान ३'साठी प्रशिक्षक,शिक्षकांनी केले कौतुक
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- शहरातील समर्थ ज्युनिअर कॉलेज व हायस्कुल रामटेक येथे नुकतीच १२ व १३ डिसेंबर दरम्यान दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनी पार पडली. यात शाळेतील सातव्या वर्गातील विद्यार्थी त्रिनेत्र चंद्रशेखर बावनकर याने ' चंद्रयान ३ ' मॉडेल तयार करून त्याचे वैज्ञानिक महत्व निरिक्षक मंडळ तथा शिक्षकांना पटवून दिले. सर्वांना कौतुकास्पद वाटल्याने त्रिनेत्र ला यावेळी प्रथम पारितोषीक ट्रॉफी ने सन्मानीत करण्यात आले...
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा बौद्धीक विकास होवुन त्यांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी शिक्षण विभाग विभागिय, जिल्हा, तालुका तथा शाळा स्तरावर विविध प्रकारच्या स्पर्धा तथा प्रदर्शनीचे आयोजन करीत असते. शहरातील समर्थ ज्युनियर कॉलेज व हायस्कुल रामटेक येथे अशीच तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी आयोजीत करण्यात आली होती. यात शाळेतील अनेक विद्यार्थी विद्यार्थीनींनी आपला सहभाग नोंदवत आपल्या बुद्धीच्या भरवशावर साकारलेल्या मॉडेल्स चे प्रदर्शन केले. यात शाळेचा ७ व्या वर्गातील विद्यार्थी त्रिनेत्र चंद्रशेखर बावनकर या विद्यार्थ्याने ' चंद्रयान 3 ' मॉडेल तयार करून त्याचे वैज्ञानिक महत्व प्रशिक्षकांसह शाळेतील शिक्षकांना पटवुन दिले. त्रिनेत्रची कामगीरी तथा कलाकृती व बौद्धीक क्षमता पाहुन सर्वांच्या भुवया यावेळी उंचावल्या होत्या. त्याच्यावर अक्षरशः कौतुकाचा वर्षाव झाला. दरम्यान पारीतोषीक वितरण सोहळ्यात पंचायत समिती उपसभापती नरेंद्र बंधाटे, गटशिक्षणाधिकारी भाकरे, समर्थ शिक्षण मंडळाचे सचिव ऋषीकेश किंमतकर व प्राचार्या लोखंडे मॅडम यांचे हस्ते एक मोठी ट्रॉफी तथा प्रमाणपत्र देऊन विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या त्रिनेत्र ला सन्मानित करण्यात आले. त्रिनेत्र ने आपल्या यशाचे श्रेय वडील चंद्रशेखर, आई रोशनी, ताई परिणिता व वर्गशिक्षक यांना दिले आहे...
