सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : श्री तारणतरण दिगंबर जैन समाज रामटेकच्या वतीने 21 ते 26 डिसेंबर दरम्यान तारणतरण जैन मंदिर, झंडा चौक, रामटेक येथे सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 3.30 ते 7.30 या वेळेत ॲक्युप्रेशर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रमेशचंद्र जैन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
ॲक्युप्रेशर थेरपिस्ट प्रेम चौधरी आणि प्रवीण सरन यांनी सांगितले की, ॲक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग अँड ट्रीटमेंट इन्स्टिट्यूट, जोधपूरचे तज्ज्ञ शिबिरात सेवा देत आहेत. पुरानी सर्दी, डोकेदुखी, माइग्रेन, डोळे, कान, नाक, घशाचे आजार, गुडघेदुखी, रक्तदाब, शुगर, पाठदुखी, नैराश्य आदी आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
