भाजपा युवक जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांचे आमदार निरंजन डावखरेंना साकडे.
माणगाव :- (नरेश पाटील) माणगांव शहरामध्ये पदव्युत्तर व स्पर्धा परीक्षा/शासकीय नोकरभरती करीता सुसज्ज अभ्यासिका केंद्र व्हावे अशी मागणी भाजपाचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा.निरंजनजी डावखरे यांच्या सुविद्य पत्नी मा.नीलिमाताई डावखरे यांच्याकडे केली असून यावर लवकरात लवकर माणगांवकरांचे व नजीकच्या श्रीवर्धन, म्हसळा,तळा तालुक्यातील पदवीधरांचे कित्येक वर्षांचे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्राचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सौ.डावखरे यांनी सांगितले... आमदार निरंजन डावखरे हे सलग तिसऱ्यांदा या मतदार संघातून प्रचंड बहुमतांनी निवडून आले असून लोकसभा झाल्यानंतर तातडीनेच त्यांनी मतदार संघात असणारे भाजपा महायुतीचे कार्यकर्ते, पदवीधर मतदार, शिक्षक संघटना व समविचारी संस्था संघटना यांना संपर्क करून मतदारसंघातील प्रत्येक विधानसभानिहाय दौऱ्याला सुरवात केली आहे... त्याच निमित्ताने त्या माणगांव येथील वनवासी कल्याण आश्रमशाळा येथे आलेल्या असताना झालेल्या बैठकीमध्ये भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष युवानेते निलेश थोरे यांनी सांगितले कि, माणगांव तालुका हा भविष्यातील रायगड जिल्ह्याचे ठिकाण होणार असून माणगांव शहरामध्ये सद्यस्थितीला लॉ कॉलेज, BSc Chem, BSc IT, Bsc Nursing, CBSC School, ITI अश्या प्रकारचे विविध विषयांवर पदवी घेण्यासाठी विद्यालये असून तालुक्यातील लोणेरे या गावी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ असून तेथे दरवर्षी शेकडो विद्यार्थी अभियांत्रिकी पदवी घेत असतात... या सगळ्याच विद्यार्थ्यांनी भविष्यात विविध क्षेत्रांमध्ये ज्ञान मिळवावे व MPSC, UPSC, IRC, IFSC, IFS, IRS ....अश्या अनेक स्पर्धा परीक्षा, शासकीय, बँकिंग परीक्षा उत्तीर्ण व्हाव्यात याकरीता मध्यवर्ती ठिकाण म्हणून माणगांव शहरामध्ये सुसज्ज अभ्यासिका व्हावी जेणेकरून भागातील सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल. यावर बोलताना सौ.नीलिमा डावखरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सदरच्या अभ्यासिका केंद्र उभारण्यासाठी थेट केंदशासनाच्या पातळीवरूनही आपण प्रयत्न करू आणि लवकरात लवकर सदरच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले... दरम्यान अश्या प्रकारची अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्र झाले तर माणगांव व परिसरातील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा, महाड या तालुक्यानाही याचा थेट लाभ होणार असून आपल्या भागातूनही अनेक अधिकारी घडतील असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला... प्रसंगी जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, माणगांव ता.अध्यक्ष गोविंद कासार, श्रीवर्धन ता.अध्यक्ष आशुतोष पाटील, युवा मोर्चा ता.अध्यक्ष प्रणय पेडणेकर, सरचिटणीस जहेंद्र मुंढे, बाबुराव चव्हाण, शिक्षक परिषदेचे पदाधिकारी, आश्रमशाळेचे भगत सर, काशिनाथ गाणेकर सर, अशोक यादव, समीर धनसे, चिन्मय मोने, अमोल पवार, महेश पाटील, मंदार मढवी व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...
