महाराष्ट्र वेदभुमी

रस्त्यामुळे आयुष्य खडतर ! मृत्युला जवाबदार कोण ?

 

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवास होतो वैकुंठधामचा

सचिन चौरसिया प्रतिनीधी

रामटेक :- तालुक्यातील नगरधन गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असून मानापूर ते नगरधन या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी विद्यार्थी आणि ग्रामस्थांतून होत आहे...

सुमारे पाच किलोमीटरचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत आहे... 

या गावांना जोडणारा रस्त्याची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरील दुरर्‍या गावातील नागरीकांना उद्योग, व्यवसाय, शाळा, नोकरी, रुग्णालय महाविद्यालयीन शिक्षणासाठी रामटेक शहरात यावे लागते. अशा या खड्डेमय झालेल्या रस्तावरुन जीव मुठीत घेत जीवघेणा प्रवास करावे लागत असून रात्रीच्या वेळी खड्डय़ाचा अंदाज येत नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत. नगरधन-मानापूर या पाच किलोमीटरच्या अंतरावरती खड्डे पडल्यामुळे वाहन चालवत असताना चालकांना कसरत करावी लागत आहे...

 नगरधन व रामटेक हा फक्त पाच किलोमीटर असल्यामुळे वेळेची बचत होते व नागरिकांना लागणाऱ्या गाडीचा इंधनाची बचत होते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. नगरधन ते रामटेक येथे जाण्यासाठी हा मार्ग जवळचा व सोयीचा असून, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या मार्गाने अवजड वाहनाची वर्दळ मोठी असल्याने डांबरीकरण नेहमीच उखडले जात आहे. तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टीगेल्या दोन ते तीन वर्षांच्या काळात या रस्त्याच्या डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र रस्त्याची परिस्थिती जैसे-थे आहे. नागरिकांचा आक्रोश लक्षात घेता कधी-कधी रस्त्याची मलमपट्टी केली जाते. काही दिवसांनंतर पुन्हा खड्डे निर्माण होतात. त्यामुळे या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण होणे गरजेचे आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात घडत आहेत. महिला, प्रवाशी, रुग्ण यांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे. डांबर उखडले गेल्याने माती व धुळीचा सामना करावा लागत आहे. रस्ता कधी दुरुस्त होणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहने नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना तसे वाहनधारकांनाही मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post