वहाळ ग्रामपंचायत येथील ग्राम विकास अधिकारी नंदकिशोर भगत यांच्याकडे कोट्यावधीची माया ; सामाजिक कार्यकर्ता अरमार पवार
पनवेल विशेष वार्ताहर :- पनवेल मधील सामाजिक कार्यकर्ते अरमान पवार यांनी वहाळ ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी नंदकिशोर भगत यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. नंदकिशोर भगत यांनी आपल्या विकासाच्या कार्यामध्ये हात धुवून स्वतःचा विकास केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता अरमान पवार यांनी केले आहे...
अरमान पवार यांनी केलेले आरोप आणि त्यामधील तथ्य!
1.तीन हॉटेल्सचे मालकत्व:
नंदकिशोर भगत यांच्याकडे तीन हॉटेल्स व रिसॉर्ट्स आहेत. या तीन हॉटेल्सपैकी एक पनवेल येथे आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने अशा प्रकारे हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चालवणे हे शासनाच्या नियमांचे सरळ उल्लंघन आहे.
2.हॉटेलमधून दारूविक्री (परवानगीशिवाय):
त्यांच्या हॉटेल्समध्ये दारूविक्री सुरू आहे आणि ती कोणत्याही कायदेशीर परवाना (license) शिवाय केली जात आहे... अशा प्रकारे दारूविक्री करणे हे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क कायदा, 1949 च्या तरतुदींचे सरळ उल्लंघन आहे...
3.भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर:
पनवेलमधील त्यांच्या हॉटेलमध्ये एक गुप्त कार्यालय आहे, जिथे ते सर्व आर्थिक व्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचे सेटलमेंट करतात... एका ग्रामविकास अधिकाऱ्याने अशा प्रकारे पदाचा गैरवापर करणे हे महाराष्ट्र नागरी सेवा आचारसंहिता, 1979 (Maharashtra Civil Services Conduct Rules) च्या तरतुदींचे उल्लंघन आहे...
4.सरकारी कर्मचाऱ्याचे दुसरे व्यवसाय:
एका सरकारी कर्मचाऱ्याने (विशेषतः ग्रामविकास अधिकारी) दुसरे व्यवसाय (हॉटेल मालक होणे) करणे केंद्रीय सिव्हिल सर्व्हिसेस आचारसंहिता नियम, 1964 (Central Civil Services Conduct Rules) च्या नियम क्रमांक 13 च्या अनुसार निषिद्ध आहे..
कोणत्या कायद्यांचे उल्लंघन केले
•महाराष्ट्र नागरी सेवा आचारसंहिता, 1979:
•कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने पदाचा गैरवापर करून वैयक्तिक फायदे घेणे बेकायदेशीर आहे.
•महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क कायदा, 1949:
•परवाना नसताना दारूविक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे, ज्यावर दंडात्मक कारवाई होते.
•भारतीय दंड संहिता (IPC) कलम 409:
•पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार करणे हा गुन्हा आहे.
•सार्वजनिक विश्वस्त कायदा:
•सरकारी अधिकारी हा जनतेसाठी ट्रस्टीसारखा असतो. हॉटेल्स आणि भ्रष्टाचाराद्वारे आर्थिक फायद्यासाठी काम करणे हा जनतेच्या विश्वासाचा भंग आहे...
प्रशासनाकडे केली मागणी
1.तातडीने चौकशी:
नंदकिशोर भगत यांच्या मालकीच्या हॉटेल्स आणि त्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणांची तातडीने चौकशी व्हावी...
2.दारूविक्री प्रकरणाचा तपास:
त्यांच्या हॉटेल्समध्ये परवाना नसताना सुरू असलेल्या दारूविक्रीविरोधात कारवाई करण्यात यावी...
3.त्यांच्या पदावर कारवाई:
नंदकिशोर भगत यांना त्यांच्या पदावरून हटवून त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार धरले जावे...