महाराष्ट्र वेदभुमी

बंगलादेशात हिंदू समाजावरील अत्याचारावर माणगांवात न्याय यात्रा

माणगाव तहसीलदार यांना निवेदन सादर करणार.

माणगाव :- (नरेश पाटील) बंगलादेशातील अटकेत असलेल्या साधूंची त्वरित मुक्तता व्हावी, तसेच तेथील हिंदू समाजावर अमानविय  अत्याचार होत असल्याचा पार्शवभूमिवर वेदना व्यक्त करण्यासाठी न्याय यात्रेची आयोजन सकल हिंदू समाज, माणगाव तालुकातर्फे रविवारी दि. ०८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता बालाजी मंदिर, माणगाव शहर येतुन सुरु होऊन मुख्य बाजार पेठ, कचेरी रोड तसेच विकास कॉलोनी मार्गी जाऊन तहसीलदार यांना निवेदन सादर करणार आहे... दरम्यान याबाबत माणगाव शहरात तसेच तालुक्यात सकल हिंदू समाज यानी या न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी अहवान पर पत्रक वाटप करण्यात आली आहे... 


या पत्रकमध्ये बंगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणी इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता व्हावी हीच प्रमुख मागणी तसेच अत्यंत कठोर शब्दात याचा निषेध नोंदविण्यासाठी त्याचबरोबर भारत सरकार यानी बंगलादेशातील हिंदूंच्या सरंक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ अंमलात आणावेत आणी अटकेत असलेल्या बंगलादेशातील साधूंची त्वरीत मुक्तता व्हावी यासाठी बांगलादेशी सरकारला निर्देश ध्यावे तसेच इतर पाच मुद्द्याची ही मागणी सदर निवेदनद्वारे माणगाव तहसीलदार यांच्याकडे सादर करून न्याय यात्रा आयोजन करण्यात आली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post