महाराष्ट्र वेदभुमी

आमदार आशिष जयस्वाल यांना मंत्रिपद द्या

 

पत्रकार परिषदमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक -:आमदार आशिष जयस्वाल हे महाराष्ट्रच्या विधानसभेमध्ये पाचव्यांदा प्रतिनिधित्व करीत आहेत. चारदा ते शिवसेनेच्या धनुष्यबाणावर व एकदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. अपक्ष असताना देखील त्यांनी महायुतीला आणि शिवसेनाला आपले समर्थन दिलेले होते. तेव्हा आतातरी त्यांना मंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी शिवसेना पदाधिकारी तथा माजी नगरसेवक राजेश किंमतकर तथा सुमीत कोठारी यांचेसह कार्यकर्त्यांनी केलेली आहे.

एक अत्यंत अभ्यासु असे व्यक्तिमत्त्व म्हणून ते महाराष्ट्रात ओळखले जातात. शासनाच्या युती सरकारच्या काळात शासनाचे क्रित्येक शासन निर्णय बनविणारे एक प्रभावी आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी केवळ आपल्या मतदासघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री पांदण रस्त्याचे शिल्पकार, आपल्या मतदारसंघात लाडली बहीण शासकिय योजना प्रभावीपणे राबविण्यात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. आजपर्यंत रामटेक विधानसभा क्षेत्राला ७५ वर्षाच्या कार्यकाळामध्ये केवळ मधुकर किंमतकर यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ वगळता मंत्रीपदाची  संधी मिळाली नाही. पण त्यानंतर रामटेक विधानसभेला कधीही मंत्रीपद लाभलेले नाही. यावेळेस आशिष जयस्वालच्या रूपाने त्यांना मंत्रिपद मिळावे अशी मागणी माजी नगरसेवक तथा शिवसेना शहर अध्यक्ष राजेश किंमतकर, माजी नगरसेवक सुमीत कोठारी यांचे सह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या एका पत्रपरिषदेत केलेली आहे...

सक्षम नेतृत्वाला मंत्रीपद द्यावे - संजय झाडे

तब्बल पाच वेळा विधानसभा निवडणुकीचे रणांगण पार करणे सहज बाब नाही पण आमदार आशिष जयस्वाल यांनी ते करून दाखविले आहे. तेव्हा महायुतीच्या दिग्गजांनी याची दखल घेतली पाहिजे, आमदार जयस्वाल यांची कदर केली पाहिजे. तसंही मोठा कालावधी लोटला असला तरी मात्र या विधानसभा क्षेत्रात मंत्रीपद लाभले नाही तेव्हा आशिष जयस्वाल मंत्रीपदासाठी पात्र असुन त्यांना मंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post