महाराष्ट्र वेदभुमी

ख्रिस्ती बांधव मध्यरात्री एकत्र येत नाताळ सण केला साजरा.


ख्रिस्तीय समाजात "गाढव" या प्राण्याला विशेष महत्व फादर मॅथयू.

माणगाव :- (नरेश पाटील) नाताळ सणाचे औचित्य साधून परिसरातील अनेक ख्रिस्ती बांधव यांनी मंगळवारी दि. 24 डिसेंबर रात्री  एकत्र येत प्रभू येसू ख्रिस्त चा जन्म सोहळा अत्यंत उत्साहत साजरा केला... दरम्यान बाल येसूची जन्म सोहळ्याची धार्मिक विधी रात्री 10 वाजता ख्रिस्मस गाण्यानी सुरवात झाली... यानंतर येसूच्या बाळ मुर्तीचा आशीर्वाद घेऊन जमलेल्या पुरोहित (फादर्स) यांनी करून सुंदर सजावट केलेल्या गायीचा गोठ्यात ठेवून सणाला चालना दिली. दरम्यानाचा काळात मुख्य पुरोहित फादर मेथयू  यांनी पूजा पाठ अर्पण करून जमलेल्या ख्रिस्ती बांधव यांना बाल येसूची जन्म सोहळ्याचे कथा कथन करताना एक बाब खास निदर्शनास आणून सांगितले कि " प्रभू येसू ख्रिसताची जन्म बाबत पूर्व कल्पना, हा फक्त गाढवालाच माहीत होती. ज्या गायीचा गोठ्यात ख्रिस्त जन्माला आला. तेथील गायी,बैल,बकरी, मेंडी, घोडा सह ईतर पाळीव प्राणी होते... प्रभू येसू ख्रिस्तची आई माता मरियम गाढवावर बसून आश्रयासाठी अनेक घर शोधले मात्र कुठेही जागा मिळाली नसल्याने अखेर गायीच्या गोठ्यात बाल प्रभू येसूचा जन्म झाला... गाडढवाचे दुसरे उदाहरण सांगताना फादर यांनी सांगितले कि प्रभू येसू ख्रिस्त यांची एका ठिकाणी राजा म्हणुन त्यांचे स्वागत करताना एक विशेष दृश्य नजरेस पडले कि येसूनी गाढवावर बसून एका गावात प्रवेश केले...


यावरून हे स्पष्ट संदेश जातो कि गाढव या प्राण्याला ख्रिस्तीय धर्मात विशेष स्थान आहे... कारण हा प्राणी कष्टाने, प्रामाणिक, संयमी  आहे.. म्हणूनही ख्रिस्त जन्मविषयी असो आणी राजा म्हणुन स्वागत करण्यात आला... तर हा गाढव प्राणी याची विशेष भूमिका पार पडली... येसूची शिकवणूक प्रेम, त्याग, क्षमा याबाबत समस्त मानव जातला दिलेला संदेश यावर प्रकाश ठाकत फादर मेथयू कोरात्तीईल यांनी आपण आपला जीवनात आचरणात आणले पाहिजे.. तरच नाताळ सण खऱ्या अर्थाने साजरा केल्यासारखे होईल असे सांगुन जमलेल्या ख्रिस्त भक्त यांना नाताळ सणाचे हार्दिक शुभेच्छा दिल्या.. 

 दरम्यानाचा काळात नाथाळ विधी सेवेसाठी अमरदीप संस्थेतील 'वेदरुणा',इंदापूर येथील 'होली स्पिरिट' तसेच म्हसळा येथील "कॅनोसा" सिस्टर्स यानी अतिशय सुंदर नाताळ सणाचे इंग्लिश, हिंदी आणि मराठी या भाषेत सादर केले.. तर फादर अनिल पॉल हे खास पुणे येथून येऊन यानी कॅशियो वाजवून नाताळ सणाचे उत्सवाला वातावरण निर्मित केले... विधीपूजाकरीता सर्व विकास दीप संस्थेचे अध्यक्ष फा. थॉमस शिकवेरा त्यांचे सहाय्यक फा. मॅथयू त्याचबरोबर तळा येथील "जनसेवा" संस्थेतील फा. जॉन लुकास यांनी आपली खास उपस्थिती दर्शवून भाग घेतले...तसेच ब्रदर ऍंथोनी जॉन्सन यांनी ही विशेष मेहनत घेतले...

 दरम्यान धार्मिक विधी संपन्न झाल्यावर ख्रिसमस केक कापून "हॅपी ख्रिसमस" ची गाण्याच्या तालावर आणी "जिंगेल बेल्स, जिंगेल बेल्स, जिंगेल ऑल द वे ", गायीचा गोठ्यात ख्रिस्त जन्माला, पूर्वीच्या चांदण्याचा तारा उगवला... असे सणाचे अनेक भक्तीगीत गाऊन जोरदार नाच गाण करून उपस्थित ख्रिस्ती भक्त यांनी एकमेकांना नाताळ सणाचे खास शुभेच्छा देवून सांगता केले आणि डिसेंबर 25 ख्रिस्मस सणाचे उत्सव साजरा करीत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post