महाराष्ट्र वेदभुमी

या’ वयातील मुलांना मोबाइल देत असाल तर भविष्य येऊ शकतं धोक्यात


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक : मुलाला स्मार्टफोन देण्यासाठी योग्य वय कोणते आहे? हा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात नक्कीच आला असेल. अलीकडच्या काळात असे दिसून आले आहे की जेव्हा मूलं हट्ट करतात किंवा रडतात तेव्हा त्याला शांत करण्यासाठी त्यांचे पालक सर्रास फोन त्याच्या हातात देतात. मुल कधीकधी फोनवर व्हिडिओ स्क्रोल करताना किंवा गेम खेळताना दिसतात. आधी पालकांचा फोन मागवण्याचा हट्ट करणारी मुलं हळूहळू स्वत:चा वेगळा स्मार्टफोन (Smartphone addiction in children) मागवण्याचा हट्ट करू लागतात. अनेक वेळा हट्टीपणात मुलं खाणं-पिणंही सोडून देतात...

मोबाइलसाठी मुलांचे योग्य वय काय?

ऑनलाइन शिक्षण आणि मोबाइल हे एक वेगळंच समीकरण सध्याच्या परिस्थितीमध्ये निर्माण झालं आहे. प्रत्येक वयोगटातील मुलांच्या हाती आज आपण मोबाइल पाहतो. तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूला नजर फिरवली तर लहान मुलांना मोबाइलची प्रत्येक माहिती अगदी परफेक्ट माहित असते. अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स काउंसिल ऑन कम्युनिकेशन अँड मीडियाचे चेअरमन डॉक्टर नुशीन अमीनुद्दीन यांच्या म्हणण्यानुसार, मुलांना कोणत्या वयात मोबाइल द्यावा हे काही ठरलेलं नाही... मुलं कितपत समजूतदार झाली आहेत आणि त्यांच्या जीवनशैलीवर हे आधारित असतं...मोबाइल म्हणजे काही मुलांसाठी एक गरज म्हणून देखील असू शकते...

 ऑनलाईन शिक्षणातून काय सिद्ध झालं?

करोना काळात मुलं घरात बसूनच ऑनलाइन शिक्षण घेत आहेत...पण हे सारं करत असताना मुलं नेमकं मोबाइलवर काय करत आहेत हे देखील पालकांनी पाहणं गरजेचं आहे... पिउ रिसर्च सेंटरने २०२०मध्ये प्रदर्शित केलेल्या अहवालानुसार ४५ टक्के पालक वयाच्या १२ वर्षाआधी मुलांच्या हातात मोबाइल न देण्याचा निर्णय घेतात... तर २८ टक्के पालक मुलं १५ वर्षाची झाल्यानंतर त्यांना मोबाइल देण्यात यावा असं म्हणतात... तसेच २२ टक्के पालक ११ वर्षापेक्षा देखील लहान मुलांना मोबाइल देण्यास तयार होतात... आता मुलांना नेमक्या कोणत्या वयात मोबाइल द्यावा या विचारात तुम्ही देखील पडला असाल... यावर आपण तज्ज्ञांचं मत जाणून घेऊया...

Post a Comment

Previous Post Next Post