मार्ग काढतांना तारांबल.
कोलाड (श्याम लोखंडे) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड बाजापेठेत बुधवार दि.२५ डिसेंबर २०२४ रोजी नाताळच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गोव्याकडे जाण्यासाठी चाकरमानी यांनी सकाळी पहाटे ६.०० वाजाण्याच्या सुमारापासुन गर्दी केली असुन यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण झाली...यामुळे यातून मार्ग काढतांना प्रवाश्यांची तारांबल उडाली असल्याचे चित्र पाहवयास मिळाले...
मुंबई-गोवा हायवेवरील कोलाड (आंबेवाडी ) बाजारपेठेत चौपदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे येथील येणारी जाणारी वाहतूक बाय पास रस्त्यावरून वळविण्यात आली परंतु नाताळची सुट्टी असल्यामुळे असंख्य चाकरमानी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी टुव्हीलर, फोर व्हिलर,एसटीबस, प्राव्हेट बस तसेच मिळेल त्या इतर वाहनाने गोव्याकडे निघाले आहेत.यामध्ये भरीतभर म्हणून अपुरे रस्त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असुन यामुळे वाहतूक कोंडी हि निर्माण झाली असल्यामुळे प्रवाशी वर्ग त्रस्त झाले असल्याचे दिसून आले..
मुंबई गोवा महामार्गावरील पुई महिसदरा नदीच्या पुलापासून कोलाड नाक्यापर्यत पर्यंत दोन किलोमीटरच्या अंतरावरील रस्ता हा सिंगल असल्यामुळे येथून वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे... येथील रस्त्याची अवस्था अतिशय बिकट असुन यामुळे नागरिकांची मार्ग काढतांना तारांबल उडाली...पुई महिसदरा नदी पुलापासून कोलाड तसेच तळवली पर्यंत एका बाजूच्या मार्गाचे काम सुरु असुन येणारी जाणारी वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविण्यात आली आहे... यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असुन याचा नाहक त्रास प्रवाशी वर्गाला सहन करावा लागत आहे...
