महाराष्ट्र वेदभुमी

६१व्या वर्षी सिहान राजू गणपत कोळी यांना मलेशियात ६डिग्री ब्लॅकबेल्ट प्रदान.


उरण दि २७ (विठ्ठल ममताबादे):नुकत्याच झालेल्या ५० व्या गोल्डन ज्युबली ॲनीवरसरी गोशीन-रियु कराटे फेडरेशन मलेशिया आयोजीत कराटे स्पर्धा, ब्लॅकबेल्ट  परिक्षा,  पंच परिक्षा व ११ ते १४ डिसेंबर २०२४ असे चार दिवसाचे शिबिर मेटॉवर हॉटेल सिल्का कोललमपूर मलेशिया येथे आयोजीत करण्यात आले. सिहान  राजु गणपत कोळी यांनी मास्टर काता सोचीन व गोज्युशियोशो सादर करून ग्रँडमास्टर सोके क्लेमनसु प्रमुख परीक्षक व पाच गोशिनरियुचे सिनियर परिक्षक यांच्यावर प्रभाव पाडून परिक्षेत वयाच्या  ६१ व्या वर्षी ६  डिग्री ब्लॅकबेल्ट  उत्तीर्ण झाले. तसेच त्यांनी पंच परीक्षाही पास केली. सिहान. राजु गणपत कोळी हे गोशिनरियु कराटे अँसोशिएशन इंडियाचे अध्यक्ष आहेत. त्यांना सिहान वसंतन के डब्लूकेएफ लायसन कोच सिंगापूर, मलेशिया,इंडोनेशिया, वियतनाम , जकारता, इंडीया चे गोशिनरियुचे कोच यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. सिहान राजु कोळी, सेन्साय-गोपाल म्हात्रे , सेन्साय-राकेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शना खाली रोहीत शरद घरत याने उत्तम कामगिरी करत सदर स्पर्धेत कास्य पदक पटकावले.त्याचे सर्वांनी अभिनंदन करून  शुभेच्छा दिल्या आहेत.सिहान-राहुल तावडे, सिहान-मतीआनंद, सेंसाय आनंद खारकर, सेंसाय -कृष्णा पाटिल , भुपेंद्र माळी, रेश्मा माळी, राजेश कोळी, परेश पावसकर, अंजा माने, अमिता घरत, आमिशा घरत, भुषण म्हात्रे, अनिष पतिल, शुभम ठाकुर, विग्नेश कोळी  ॲडोकेट- नितिन मोहिते, ऍडव्होकेट  शितल गणेशकर, निकिता कोळी, विनय पाटील, कृषाणु कोळी (टीम मैनेजर), सुलभा राजु कोळी या सर्वांच्या सहकार्यामुळे सिहान राजु कोळी यांना यश प्राप्त करता आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post