सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गवर एका अनियंत्रित ट्रकच्या धडकेत मोटरसायकलचे नियंत्रन बिघडले व मोटरसायकल वरील कुटुंब रोडवर पडले यात पत्नीला डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे तीच्या जागीच मृत्यु झाला असुन पतीसह मुलगा जखमी झाला आहे... वरील घटना दि. २५ ला सकाळी ९ च्या सुमारास घडली... घटनेनंतर ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला...
नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील रामधाम जवळ एमएच ४९ बीवाय १९५९ क्रमांकाच्या दुचाकीने कटंगी बालाघाट येथील रहिवासी पती लंकेश बिसेन वय ३२ वर्ष. पत्नी राणू बिसेन वय २८ वर्ष व मुलगा हिमांशू बिसेन वय ११ वर्ष हे कटंगीहुन मनसर मार्ग नागपूर कडे जात होते... रामधाम परिसरात येताच ओव्हरटेक करीत असणाऱ्या अज्ञात भरधाव ट्रकने दुचाकीला कट मारला... त्यामुळे लंकेशचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व पत्नी रोडच्या मधात पडून डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला... तर मुलगा व पती जखमी होऊन सुखरूप बचावले... अपघात होताच ट्रकचालक ट्रकसह घटनास्थळाहुन पळुन गेला...
घटनेची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी सहकार्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला... त्यांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी तर राणूचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक येथील उपजिल्हा रुग्नालयात पाठवण्यात आला असून रामटेक पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास करीत आहे...