सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- भिमालपेन ठाणा कुवारा भिवसन येथे आदिवासी युवकांनी साफसफाई केली. कुवारा भिवसन हे आदिवासींचे प्रमुख देवस्थानापैकी एक आहे. येथे मोठ्या श्रद्धेने नागरीक येतात. पारसिवनी तालुक्यातील कोलीतमारा व रामटेक तालुक्यातील देवलापार क्षेत्रात आदिवासींची संख्या मोठी असल्याने येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते...
अनेक दिवसांपासुन परिसर साफ नसल्याचे एम एच बी इंडिजीनस थिंकींग ७५० देवलापार समुहाच्या परीसरातील २५ ते ३० युवकांना गोळा करून संपूर्ण साफसफाई केली. यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामाबद्दल समाजातील नागरीकांनी त्यांचे कौतूक केले...