महाराष्ट्र वेदभुमी

धामणसई येथील स्मशानभूमी दुर्लक्षित,लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष.

 


कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील धामणसई गावातील गेल्या १० वर्षांपासून स्मशान शेडचा पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधीनीं जाणीव पूर्वक या स्मशानशेड कडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे...तर आजमितीस या विभागात अनेक आमदारांनी कार्यभार सांभळला आहे...परंतु कोणीही याची दखल घेतली नसल्याचे समजते...

परीसरात आज मीतीस आपण स्वातंञ्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एखाद्या गावखेड्यात जनता प्राथमिक गरजा पासून वंचित राहत असेल तर या लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने नक्की विकासाची व्याख्या काय असावी,तर देशाच्या स्वातंत्र्यकाळातही काही गावांचा विकास हा पारतंत्र्यात आहे असा प्रश्न पडतो...तर एखाद्या गावची प्राथमिक गरज पूर्ण करण्यास एवढा प्रदीर्घ कालावधी जात असेल तर नक्की दोष कोणास द्यावा? तर काही गावातील नागरिकांसाठी तसेच काही गावे आजही विकासापासून वंचित आहेत हे नाकारता येत नाही...

आजही धामणसई गावातील एखादी व्यक्तीचे निधन अथवा मृत पावली असता अतीमुसळधार पावसातही तिचा अंत्यविधी करताना फार मोठी कसरत करावी लागते...तर सुखाने जन्माला आलेला व्यक्तीच्या स्वर्गवासाच्या यातना याची जाणीव वेळोवेळी माजी आणी आजी आमदार मंत्री महोदयांना करुन देण्यात आली आहे तरी सुद्धा या कडे दुर्लक्ष केले जाते...हे दु्दैवच म्हणावे लागेल निवडणूकांच्या रणधुमाळीत अनेक आश्वासनांचा महापूर येतो यात सर्वसामान्य जनता वाहून जाते परंतु निवडणूकीच्या नंतर परिस्थितीत काहीही बदल होत नाही...

तरी याची दखल संबधीत खात्याकडून लवकरात लवकर करून सदरच्या स्मशानभूमी दुरूस्ती तसेच त्यावर शेडच्या उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे...

प्रतिक्रया 

रोहा तालुक्यातील धामणसई पंचक्रोशीतील धामणसई गाव हे मध्यवर्ती ठीकाण आहे... तरी सुद्धा विकासाच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींच्या वतीने वेळोवेळी विकासाच्या बाबतीत तोंडाला पाने पुसण्यात येत आहेत... अजून कीती काळ वाट पहावी लागणार आहे...गावातील स्मशान भूमी दुरूस्ती तसेच त्यावर शेड बाबत अनेकदा शासन तसेच आमदार मंत्री यांचेकडे पाठपुरावा करूनही त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने संतप्त सवाल हरेक धामणसई ग्रामस्थ विचारत आहे.... विश्वास सानप सामाजिक कार्यकर्ते धामणसई .

Post a Comment

Previous Post Next Post