ना. जयस्वालांचे प्रथमच जन्मगाव काचुरवाही येथे आगमण
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- रामटेक तालुक्यातील काचुरवाही हे राज्यमंत्री अँड. ना. आशिष जयस्वाल यांचे जन्मगाव असुन प्रथमच राज्यमंत्री झाल्यावर आगमनादरम्यान शिवसेना-भाजपा पदाधिकारी तसेच गावकर्यांच्या वतीने ( ता.२९ ) ला बाजार चौकात त्यांचा सत्कार करुन लाडुतुला करण्यात आला. यावेळी गावातील नागरिकांनी ठिकठिकाणी राज्यमंत्री जयस्वाल यांच्या पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन गौरव सत्कार करण्यात आला...
यावेळी कार्यक्रम दरम्यान ते म्हणाले राज्यमंत्रीपदासाठी मला जे खाते दिले ते आव्हानात्मक असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करणार आहे तसेच रामटेक विधानसभेसह अनेक जिल्ह्यातील विकास कामांना प्राधान्य देत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देणे हेच उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री अँड आशिष जयस्वाल यांनी केले. राज्यातील शिवसेना पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना कार्यकर्त्यांना मोठा करणारा पक्ष आहे पक्षाने दिलेल्या छोट्या जबाबदाऱ्या पार पडत आज मी राज्यमंत्री पदापर्यंत पोहोचलो आहे पक्षामध्ये संपर्क भावनेने काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळे पक्षाची आज अविरत घोडदोड सुरू आहे त्यामुळे माझ्या आयुष्यात अमूल्य योगदान असणाऱ्या कार्यकर्त्यांना हा सत्कार समर्पित करीत आहो असे प्रतिपादन त्यांनी केले...
यावेळी गट ग्रामपंचायत काचुरवाही खोडगाव ग्रुप, संजीवनी पतसंस्था काचुरवाही ग्रुप ,केशव मोरे कंट्रक्शन मसला( काचुरवाही) ग्रुप, स्व. अँड. नंदकिशोर जयस्वाल माध्यमिक विद्यालय ग्रुप, हनुमान मंदिर पंच कमिटी ग्रुप, सुरज मतिमंद मुलांची शाळा ग्रुप, हरीश हूड किरणापुर ग्रुप, विकी बावनकुळे ग्रुप काचुरवाही, अल्ट्राटेक कामगार युनियन ग्रुप, परमात्मा एक ग्रुप काचुरवाही, आदी संस्था, कडून सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषद संजय झाडे, शिवसेना रामटेक तालुका प्रमुख विवेक तुरक, संजीवनी पत अध्यक्ष तथा माजी जि.प सदस्य देवराव धुर्वे, कालिदास पत संस्थेचे अध्यक्ष अनिल कोल्हे, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश धोपटे, वर्षां धोपटे, देवराव धुर्वे, माजी न.प.सभापती बिकेद्र महाजन, युवासेना उपजिल्हा प्रमुख कमलेश शरनांगत, भाजप नागपूर जिल्हा महामंत्री राहुल किरपान, माजी पंस सभापती किरण धुर्वे, हर्षवर्धन निकोसे, सरपंच सविता नागोसे, उपसरपंच अनिकेत गोल्हर, सुनिल कोल्हे, चंदु बावनकुळे, नंदु नाटकर, सुभाष नागोसे,रोशन ढोबळे,राहुल डोकरीमारे, प्रदिप गोल्हर, प्रविण नाटकर, अनिकेत कोठेकर, संजय सूर्यवंशी यांच्यासह आदींची उपस्थिती होती...
