चणेरा प्रतिनिधी (सत्यप्रसाद आडाव):.महाराष्ट्र राज्यात नवभारत साक्षरता अभियान हा कार्यक्रम अतिशय उत्साहात व मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे.. नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत असाक्षर व्यक्तींची पाहणी करणे, स्वयंसेवकांची माहिती घेणे, शालेय माहिती तपासणे, शालेय विविध उपक्रमांची पाहणी करणे आदी बाबींबाबत उपसंचालक पुणे योजना भाऊसाहेब सरक साहेब व महेंद्र बागडे यांनी मुरुड तालुक्यास भेट दिली. मुरुड तालुक्यातील भेटीमध्ये चोरढे मराठी शाळा, वळके हायस्कूल व इतर शाळांची त्यांनी पाहणी केली. पाहणी मध्ये असाक्षर उपक्रमांतर्गत असाक्षर व्यक्तींची हजेरी, त्यांची उल्हास ॲपवरील नोंदणी, टॅग केलेले असाक्षर, त्यांच्यासाठी नेमलेले स्वयंसेवक, स्वयंसेवक सोबत चालू असलेले वर्ग, शालेय रेकॉर्ड, स्वयंसेवकांची हजेरी, स्वयंसेवकांसोबत हितगुज, वर्ग चालू असलेले फोटो, असाक्षर व स्वयंसेवक यांचे व्हिडिओ, शाळा व्यवस्थापन कमिटी अहवाल, शिष्यवृत्ती वर्ग, विद्यार्थ्यांचे पथनाट्य, आढावा बैठक संख्या, जनजागृती प्रचार यासाठी राबवलेले उपक्रम, असाक्षर वाचन साहित्य, असाक्षरांच्या शाब्दिक नोंदी इत्यादी बाबी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले...
तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी , विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख महेश कवळे ,साधन व्यक्ती, चोरढे शिक्षक वृंद, वळके हायस्कूल शिक्षक वृंद यांचे कौतुक केले. नवभारत उपक्रम मुरुड गटात अतिशय चांगल्या प्रकारे राबविला जात असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. चोरढे मराठी शाळेत विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विविध उपक्रम पाहून त्यांनी विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस दिले...
भेटीच्या वेळी तालुका गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी, साधन व्यक्ती पुकळे, चेतन पाटील, दत्ता सातामकर, केंद्रप्रमुख महेश कवळे, संदीप पाटील, मुख्याध्यापक संगीता भगत, शिक्षक वृंद राजेंद्र नाईक, विजय जाधव, प्रतिभा वर्तक आदी शिक्षक उपस्थित होते...
