माणगाव- रायगड(नरेश पाटील)-: संगीत मध्ये इतकी ताकद असते कि ते वातावरणच बदलू शकते असे प्रांजळ मत अलिबाग जिल्हा कारागृहाचे अधीक्षक श्री. अशोक कारकर यांनी व्यक्त केले होते.... निमित्त होते रायगड जिल्ह्यातील अलिबाग जिल्हा कारागृहात कैदी वर्गांसाठी "प्रिझन मिनिस्ट्री" या संस्थेकदून आयोजित उदघाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते... सदर उपक्रम अप्पर पोलीस महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक माननीय प्रशांत बुरडे, विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह माननीय जालिंदर सुपेकर व कारागृह उपमाहानिरीक्षक दक्षिण विभाग माननीय योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनखाली सोमवार दि. 11 डिसेंबर 2024 रोजी हाती घेण्यात आला होता... सदर कार्यक्रम मुंबई सरधर्मप्रांत तसेच अलिबाग चर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता...
व्यासपीठावर रायगड प्रांताचे बिशप ऑल्वीन डिसिल्वा, कार्यक्रमचे समन्वयक फा. ग्लॅस्टन घोंसालविस, रायगड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक अशोक कारकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी रामचंद्र रणनवर, अलिबाग चर्चचे प्रमुख फा. सायमन रॉड्रिग्ज, सिस्टर फ्लोरीप तसेच ब्रदर स्टारसन आणि संस्थेचे स्वयंसेवक उपस्थित होते... कार्यक्रमाची सुरुवात प्रिझन मिनिस्ट्री संस्थेकडून कैदी वर्गांसाठी दिलेल्या संगीत साहित्य उपकारणाच्या लोकार्पण ने बिशप ऑल्वीन ह्यांच्या हस्ते फित कापून झाली... यानंतर सभा स्थळी कार्यक्रमाची सुरुवात भक्ती गीत "इतनी शक्ती हमे दे ना दाता" ह्या गीताने झाली, फा. सायमन ह्यांनी मान्यवरांचे स्वागत केले... कार्यक्रमाचे समन्वयक फा. ग्लॅस्टन ह्यांनी प्रिझन मिनिस्ट्रीचे प्रास्ताविक केले. दरम्यान "नया सवेरा " ही कविता श्रीमती नेहा मेलिट ह्यांनी वाचून दाखवून सभा गृहात ऊर्जा निर्माण केली... बिशप ऑल्वीन ह्यांनी प्रिझन मिनिस्ट्री हा त्यांच्या हृदयाच्या खूप जवळ आहे कारण मला त्यांचे दुःख कळून आहे असे बोलून शुभेच्छा दिल्या... ब्रदर स्टारसन यांनीही एक बॉलिवूड " छूकर मेरे मनको किया तुने क्या ईशारा. " गीत गावून कारागृहात आनंदाचे तरंग तयार केले... कारागृहाचे अधीक्षक अशोक कारकर यानी निदर्शनास आणून दिले कि सन 2007 पासून "प्रीझन मिनिस्ट्री" चे काम राज्यातील अनेक कारागृहात होत असल्याचे सांगितले... सोबत समुपदेशन, आरोग्य, शिक्षण, कौशल्य, शिक्षा भोगून आलेल्यास जीवनाचे पुनरावसन (रिहेबिलीटेसन) करण्याचे अमूल्य उपक्रम सह अनेक सामाजिक कार्य हाती घेत आहे... तुमच्या ह्या संगीत उपकरणातून ऑर्केस्ट्रा टीम नक्कीच तयार होतील असे विश्वास व्यक्त केला...
