अलिबाग (सचिन पाटील) : पुणे जिल्ह्यातील ओतूर येथील कवयित्री युवराज्ञी सोनवणे याना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतिने पत्रकार दिनानिमित्त दिला जाणारा राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर झाल्याचे अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यानी घोषीत केले...
कु. युवराज्ञी सोनवणे यांच्या अनेक कविता व लेख विवेक वृत्तपत्रात व आनलाईन पोर्टलमध्ये प्रसिद्ध झाले असून त्याना अनेक जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेत युवराज्ञी सोनवणे यांचे साहित्यिक व सामाजिक वाखाण्यायोग्य व समाजास उद्भोधक असे आहे..
युवराज्ञी सोनवणे याना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार रविवार दि. 05 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजता रोटरी क्लब सभागृह, गंजमाळ शालिमार जवळ नाशिक येथे मान्यवरांचे हस्ते वितरीत करण्या येईल युवराज्ञी सोनवणे यांचे या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे..
