नाशिक - नाशिक जिल्ह्यातील शिवतीर्थ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने विशेष बैठक आयोजित करण्यात आली...बीड जिल्ह्यातील स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या उर्वरित मारेकऱ्यांना अटक करून आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी,या मागणीसाठी 28 तारखेला होणाऱ्या मोर्चासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारो समाज बांधव उपस्थित राहणार असून त्याचे नियोजन यावेळी करण्यात आले...महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे या ठिकाणी सर्वसामान्य लोकांनाही कायद्याने न्याय मिळतो असा परिचय या राज्याचा आहे...मात्र या राज्यात आता कायद्याचा धाक राहिला नाही.. तो धाक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे व महाराष्ट्र राज्यात आजही कायदा सुव्यवस्था कायम असल्याचे आश्वासन या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला देण्याची मागणी यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली... संतोष देशमुख यांचा दिवसाढवळ्या खून झाला गावासाठी झटणारा स्वतःच्या कुटुंबापेक्षाही गावावर प्रेम करणाऱ्या सरपंचाची या पद्धतीने हत्या झाली आहे... लोकांच्या भांडण सोडवणे हे प्रत्येक गावातील सरपंचाला करावंच लागतं हे काम शासनाचा आहे ते काम बिन बोभाट पणे सरपंच करत असतात मात्र सरपंचाला जीव देण्याची वेळ आली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण सरपंचांमध्ये आता दहशतीचे वातावरण तयार झाले आहे हे हे भय काढून टाकण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी कडक पावले उचलण्याची मागणी ही यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली...
मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर यांनी ठाम भूमिका मांडली की,"महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे,परंतु सध्या कायद्याचा धाक उरलेला नाही...गावासाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्या सरपंचाची दिवसाढवळ्या हत्या होणे अत्यंत गंभीर बाब आहे...यामुळे संपूर्ण राज्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे..."
त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करत,"दोषींना त्वरित अटक केली नाही, तर महाराष्ट्रात संघर्ष निर्माण होईल,"असा इशारा दिला...
नानासाहेब बच्छाव- यांनी समाजाला मार्गदर्शन करताना सांगितले की,"कायदा सुव्यवस्था राखणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे.जर आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात असतील,तर ते राज्यासाठी अत्यंत घातक आहे..." त्यांनी दोषींच्या सखोल चौकशीसह मुख्य आरोपींना अटक करून संतोष देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी केली...
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन डांगे पाटील यांनी केले तर आभार आशिष हिरे यांनी मांडले...
या मीटिंगसाठी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर, नानासाहेब बच्छाव, आशिष हिरे, नवनाथ शिंदे, रोशन खैरे, सुभाष गायकर, योगेश गांगुर्डे, राम खुर्दळ, दादासाहेब जोगदंड, वैभव दळवी, संगीता सूर्यवंशी, विकी गायधनी, अनिल आहेर, बाळासाहेब गारूळे,अमर गायकवाड, ज्ञानेश्वर सुराशे,.भारत पिंगळे,संकेत पिंगळे, प्रशांत सूर्यवंशी, अविनाश सूर्यवंशी,बाबासाहेब गायकवाड,विशाल पवार, अमोल पवार, दीप किशोर ठाकूर, अनिल पवार, रेखा जाधव, रागिनी आहेर, वैभव गव्हाड, सागर कातडं सुधाकर चांदवडे, सुनील शेलार,दावल पगारे, अनिल भावले, बबनराव बोडके, शुभम महाले, योगेश पाटील, पुनम पाटील,मनोरमा पाटील,काजल देवरे, सविता वाघ ,महेंद्र बेहरे, राजू भालेराव, मंगेश पाटील, प्रवीण पाटील, अर्जुन फरकाडे, नवनाथ जगताप, इम्रान खान, बच्चुलाल निशांत, बंटी देशमुख, हर्षल खैरनार, निलेश ठुबे निलेश काळे आधी समाज बांधव उपस्थित होते. .