न्युज वार्ताहर: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे... गुरुवारी (२६ डिसेंबर) अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं... मात्र उपचारावेळी त्यांचे निधन झाले... डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले असून देशात ७ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे...
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी समजताच सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत असून देशातील विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे..
डॉ. मनमोहन सिंह यांच्याबद्दल थोडक्यात माहिती :
डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी झाला होता... त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं होत... १९६२ साली डॉ. मनमोहन सिंह यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फील पदवी संपादन केली होती...
मनमोहन सिंह यांनी १९६६ ते १९६९ या काळात संयुक्त राष्ट्रात काम केलं... वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली.. भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार १९७२ ते १९७६ या काळात त्यांनी काम केलं...
भारतीय रिझर्व्ह बँकेचे १९८२ ते १९८५ या काळात ते गव्हर्नर होते...१९८५ ते १९८७ या काळात ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते...
डॉ. मनमोहन सिंह यांची १९९१व्या साली अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली...त्यानंतर डॉ. मनमोहन सिंह हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते...
२००४ साली डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली... डॉ. मनमोहन सिंह यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं... त्यानंतर डॉ. मनमोहन सिंह यांनी एप्रिल २०२४मध्ये राज्यसभेतून निवृत्ती घेतली...