महाराष्ट्र वेदभुमी

दत्त जन्मोत्सवानिमित्त अखंड हरीनाम यज्ञ सोहळा पुगाव येथे १२डिसेंबरपासून प्रारंभ.

 


पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर) : रोहा तालुक्यातील पुगांव गावामधील श्री क्षेत्र दत्तमंदिर येथे सालाबादप्रमाणे ब्रम्हीभूत अमृतनाथस्वामी यांच्या कृपाछत्राखाली, गुरुवर्य-त्रीनयनस्वामी, गुरुवर्य- सदाशिवस्वामी, गुरुवर्य-अबरधरस्वामी, गुरुवर्य- शिवानंदस्वामी, गुरुवर्य-नरेंद्रस्वामी, गुरुवर्य-नरेंद्रनाथस्वामी, यांच्या आशीर्वादात्मक प्रेरणेने सांप्रदाय भारती गुरुवर्य जनार्धनस्वामी (वाडीकर महाराज), सदानंदस्वामी- गोपाळ चव्हाण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुगाव ग्रामस्थ यांच्या सहकार्याने मार्गशिर्ष शुद्ध गुरुवार दि.१२ डिसेंबर रोजी अखंड हरीनाम सप्ताहाचे प्रारंभ झाला...

१२ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२४ या कालावधीत श्री. योगीराज दत्त जन्मोत्सव व अखंड हरीनाम यज्ञ सोहळा निमित्ताने धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमात रोज सकाळी काकड आरती, सकाळी ९.३० पंचरत्न गीता व अखंड ज्ञानेश्वरीचे पारायण होणार आहे... 

सदर कार्यक्रमाला अखिल पद्मानाभाचार्य स्वामी शिष्य सांप्रादाय विश्वस्त व सांप्रदाय भारती भेट देणार आहेत... सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सद्गुरु पद्मानाभाचार्य अमृतनाथ शिष्य संप्रदायाची कार्यकारी कमेटी, समस्त पुगांव ग्रामस्थ, महिला मंडळ, तरुण वर्ग खांब व कोलाड पंचक्रोशी मेहनत घेत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post