महाराष्ट्र वेदभुमी

रामटेक विधानसभेत भूमीपुत्र ठरला विजयाचा शिलेदार


अखेल पाचव्यांदा आशिष जयस्वालांचा विजय

 ' लाडक्या बहिनिंनी ' दिला विजयाचा धक्का

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

 रामटेक :-रामटेक विधानसभा क्षेत्रात जयस्वाल विरुद्ध मुळक असा अटीतटीचा सामना रंगणार असा कयास जणु सर्वांनीच बांधला असतांना ऐन वेळेवर लाडक्या बहिनींनी चार रेझीम आमदार राहीलेल्या आशिष जयस्वालांना विजयाचा धक्का दिल्याने ते निवडणुकीच्या रणांगणातुन विजयाचा धनुष्यबाण घेऊनच बाहेर पडले. ज्यांच्या विजयाचे वारे रामटेक विधानसभेत वाहात होते अशा अपक्ष राजेंद्र मुळक यांना पछाडत जयस्वालांनी २६७१४ मतांनी मुळकांचा पराभव करून आपल्या आमदारकीचे पद कायम ठेवले...

याबाबद आशिष जयस्वाल यांनी रामटेक शहरात विजयरॅली काढत लोकांचे, मतदारांचे आभार माणले. उल्लेखनिय म्हणजे मतमोजणी दरम्यान पहिल्या राऊंड पासुनच आशिष जयस्वाल यांनी मुळकांना पछाडत आघाडी घेतली होती, ती अखेर पर्यंतच कायम राहीली. सुरुवातीला शेकडो मतांचा असलेला फरक नंतर हजारोंच्या संखेत बदलला, तो शेवटपर्यंत कायम राहीला. बाराव्या तेराव्या राऊंड पासुनच जयस्वाल समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर फटाके फोडून विजयाचा जल्लोष करणे सुरू केले होते. मतमोजणी झाल्यावर तथा विजय निश्चित झाल्यावर आमदार जयस्वाल मतमोजणी केंद्रात दाखल झाले. येथुन काही वेळाने बाहेर निघुन केंद्राबाहेरूनच म्हणजे शितलवाडीतुन त्यांची विजयरॅली रामटेक शहराच्या दिशेने लोकांचे आभार व्यक्त करीत निघाली व रामटेक शहरभर भ्रमण केले... यावेळी चक्क जेसीबी मशीनद्वारे जयस्वालांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. दरम्यान पत्रकारांशी संवाद साधतांना आमदार आशिष जयस्वाल यांनी ' ज्या मतदारांनी मला मत दिले नाही अशा मतदारांनी मला का म्हणून मत दिले नाही.., माझ्याकडून कोणती चुक झाली याचे मी अध्ययन करेल व भविष्यात त्यांची मन जिंकण्याचा प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले...

 अशी पडली मते

आशिष जयस्वाल ( शिंदे सेना, महायुती ) - १०७४१४

राजेंद्र मुळक - ८०७०० ( अपक्ष )

विशाल बरबटे - ५४२६ ( उबाठा )

चंद्रपाल चौकसे- ३२२८ ( अपक्ष )

Post a Comment

Previous Post Next Post