उरण विशेष प्रतिनिधी:
उरण दि.24/11/2024
जन सेवेतून आनंद देणा-या वशेणी इतिहास संपादकीय मंडळ, रविकिरण हाॅस्पीस्टल वशेणी आणि मॅग्नस हाॅस्पीस्टल उलवे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच वशेणी येथे स्त्रीरोग निदान शिबीर संपन्न झाले....
या शिबिरात वशेणी परिसरातील 60 गरजू महिलांची मोफत PAP SMEAR तपासणी, रक्त व गर्भाशय तपासणी करण्यात आली... यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी देशपांडे यांनी स्त्री रूग्णांना तपासणी सोबत मार्गदर्शन सुध्दा केले... शिबिरातील गरजू महिलांना महाराष्ट्र शासन पुरस्कृत आरोग्य दुत श्री.संग्राम रत्नाजी तोगरे व महाराष्ट्र शासन पुरस्कृत समाज सेविका सौ.सुमनताई संग्राम तोगरे( केगाव उरण) यांच्या कडून मोफत औषधे देखील पुरवण्यात आली होती...
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर संचित गावंड, डाऊर जान्हवी गावंड त्याच प्रमाणे जान्हवी सपरे, झील परीख,स्वाती बागल त्याच प्रमाणे हाॅस्पीस्टल स्टाॅप आणि मंडळाचे कार्यवाहक श्री.मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेतली...
या वेळेस वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे कार्यरत सदस्य श्री.सतिश पाटील, संजय पाटील, श्री.संदेश गावंड, गणपत ठाकूर, प्रविण ठाकूर आदि सभासद उपस्थित होते...