श्रीवर्धन १९३ श्रीवर्धन मतदार संघातील विधानसभा सभेचे उमेदवार
ईश्वराच्या नियोजनमुळेच मी श्रीवर्धन विधानसभा लढत आहे- राजा भाऊ ठाकूर
म्हसळा येथे राजा भाऊ ठाकूर यांचा जाहीर प्रचार सभेला प्रचंड जनसमुदाय
माणगाव (नरेश पाटील)
म्हसळा :- १९३ श्रीवर्धन विधानसभा २०२४ मतदार संघाकरिता जो मी काढण्याकरिता उतरलो आहे, ते निव्वळ ईश्वराची नियोजन असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजेंद्र मधुकर ठाकूर उर्फ राजा भाऊ यांनी म्हसळा शहर येते एका जाहीर आयोजित सभेत सोमवारी दि.११ रोजी सायंकाळी दरम्यान व्यक्त केले... राजा भाऊ ठाकूर हे १९३ श्रीवर्धन मतदार संघात अपक्ष उमेदवार म्हणुन प्रेमाचे आहेर प्रसिद्ध असलेल्या "लिफाफा" या चिन्हावर आपला नशीब अजमावत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे...
सदर कार्यक्रमाचा वेळेत व्यासपीठावर उमेदवार राजा भाऊ ठाकूर सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार साहेब यांचे गटातील रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते सदानंद येलवे,राष्ट्रवादीचे मंगेश देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा ठाणे जिल्ह्याचे प्रभारी चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेल चे संघटक असलेल्या वैभव म्हात्रे (जो अंद आहे) रायगड जिल्हा काँग्रेस जिल्हा सचिव डॉ. नरेंद्र सिंग,पदाधीकारी सौं. डाखी, सौं.प्राची आर.ठाकूर, माणगाव ता. काँग्रेस पक्षाचे ता.अध्यक्ष विलास सुर्वे, तळा ता. अध्यक्ष शरद भोसले, रोहा ता.अध्यक्ष सुनील देशमुख, अलिबाग ता. अध्यक्ष भास्कर चव्हाण, श्रीवर्धन काँग्रेस पदाधीकारी अब्ररार,म्हसळा येथीलचे नगरसेवक सुफियान भाई, नाईम भाई, अशफाक भाई, सौं. नाझमा मुकादम, आरती पेढेणेकर, माजीद सुभेदार, ऐजाज घरटकर, लहू म्हात्रे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माणगाव ता. पदाधीकारी लहू लुस्थे सह इतर तालुक्यातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते...
उमेदवार राजा भाऊ ठाकूर यांचे सभे ठिकाणी आगमन होताच कार्यकर्ते यांनी आपला मानातील असलेल्या राजा, राजा भाऊ ठाकूर यांचे जंगी स्वागत करून फटाकडी अतिशबाज करून जोरदार स्वागत केले... दरम्यान उमेदवार राजा भाऊ ठाकूर यांनी आपला भाषणात प्रथम सर्वांचे स्वागत करून जाहीर सभा कार्यक्रमाचे आयोजक यांचे तोंड भरून स्तुती केले... कारण व्यासपीठावर लावलेल्या सर्व नेते मंडळी यांचे फोटो पाहून राजा भाऊ ठाकूर यांना भावले आणि सर्व थोर लोक नेते यांच्या प्रत्येकाचे देशासाठी आणि विकासासाठी केलेल्या कामाचे माहिती उपस्थित विराट कॉर्नर सभे मध्ये जमलेल्या मतदार यांना सांगितले... यानंतर उपस्थित यांना उद्देशून बोलताना उमेदवार ठाकूर यांनी सांगितले कि मी आमदार म्हणुन या मतदार संघात निवडून आल्यास असे कायापालट करीन कि पुढच्या निवडणूकच्या वेळेत तुम्ही मला पुन्हा निवडून आणाल... असा सांगताच टाळ्यांचा गजरात परिसर दुमदुमुन गेला... पुढे विकास कामाचे बाबत बोलताना सांगितले कि गेली १५ वर्ष पाहिजे जेवढा विकास झाला नाही मात्र याबाबत अधिक भाष्य न बोललेलेच बरं असा मिश्किल टोला नाव न घेता हाणला... पुढे राजा भाऊ यांनी खास बात सांगितले कि तीन दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले कि आम्ही जोपर्यंत सत्तेवर आहोत तोपर्यंत मुस्लिम समाज यांना आरक्षण देणार नाही... तर या मुद्द्याला स्पर्श करीत भाऊ यांनी सांगितले कि असा जातीय राजकारण करू नये... समाजातील सर्व लोक या देशात बरोबरीने आहे... पुढे बोलताना अतिशय महत्वाचे बाब सांगितले कि मी निव्वळ म्हणजे हा ईशवराचे कृपा आणि त्यांनी आखलेल्या हा नियोजन कि मी श्रीवर्धन मतदार संघात निवडणुकीकरिता उभे राहिले पाहीजे असे सांगताच उपस्थित जनसमुदाय यानी याला दाद दिले... पुढे तुम्ही पहा इथे मंचावर आणि कार्यकर्ते यांच्या सर्वांचे गळ्यात काँग्रेस पक्षाचे हात चिन्ह असलेल्या पंजा माफलर आहे आणि अंदर कि बात ये है कि खा. राहुल गांधी यांचेही आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे.. काही आपलेच लोक बाजूला सारून माझा बद्दल अपप्रचार करीत आहे... संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मला रायगड लोकसभा निवडणुकीकरिता समन्वयक म्हणुन निवड केले होते आणि जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधीकारी त्याच बरोबर कार्यकर्ते यांना विचारा की काँग्रेस पक्षाकरिता कसे मेहनत घेतले ? तसेच ज्या स्वर्गीय अंतुले साहेब यांचा आशीर्वादाने मोठा झाला तेच मुस्ताक अंतुले सांगतात कि काँग्रेस पक्षाला उमेदवारच नाही असा छापून आलेल्या बातमी पत्र भर सभेत झळकावून दाखविले आणि सांगितले कि पहा अंतुले साहेब यांना स्वर्गातुन वाईट वाटत असेल आणि पहा ईश्वरानी मला या ठिकाणी पाठवले असे सांगितले...
दरम्यान विविध विषयाला स्पर्श करीत विरोधकांचे सर्व मुद्द्यांवर चिरफाड करून अंति सांगितले कि मला आपला मतांचे दान प्रेमाचे आहेर म्हणुन ओळखले जाणारे पॉकेट अर्थातच "लिफाफा" चिन्हावर भरभरून मत मतदान करते वेळी करा आणी मला प्रचंड मतांनी विजय करा म्हणुन सांगून उमेदवार राजेंद्र मधुकर ठाकूर उर्फ राजा भाऊ यांनी उपस्थितांना आव्हाण केले.दरम्यानाचा काळात उमेदवार राजा भाऊ ठाकूर यांचा आगोदर वैभव म्हात्रे, चंद्रकांत पाटील, सदानंद येलवे, मंगेश देशमुख, विलास सुर्वे, सुफियान भाई, महिला अध्यक्ष सौं.नाजीमा मुकादम यांचेही तडफदार भाषणे झाली.
