महाराष्ट्र वेदभुमी

पेण मतदार संघात उमेदवार अतुल म्हात्रेंची प्रचारात आघाडी,घरोघरी प्रचारफेरीला उत्स्पूर्त प्रतिसाद

कोलाड(श्याम लोखंडे : रायगड, पेण, रोहा, सुधागड, विधानसभा मतदारसंघात आता ७ उमेदवार आमदारकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत महायुती भाजपचे आमदार रविशेठ पाटील आणि महाविकास आघाडीचे अतुल म्हात्रे यांच्यात चुरशीची लढत होईल असे दिसते... येत्या २० नोव्हेंबर रोजी निवडणुक होणार असल्याने जेमतेम १३ ते १४ दिवस प्रचाराकरीता प्रत्येक पक्षाच्या व उमेदवार यांच्या हातात उरले आहेत.तर या विधानसभा मतदारसंघात जरी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असले तरी खरी लढत हि तिरंगी होणार असून महायुतीचे उमेदवार येथील भाजपचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील, महाविकास आघाडी शेकापचे उमेदवार अतुल म्हात्रे आणि शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार प्रसाद भोइर यांच्यात चुरशीची लढत दिसत असून शेकापचे अतुल म्हात्रे हे प्रचारात चांगलीच आघाडी घेत आहेत तर मतदासंघांतून गावोगावी जाऊन. ग्रामीण भागात बैठकावरती व मतदार यांच्या गाठीभेटी यावर अधिक भर देत असल्याने प्रचारात मोठी आघाडी घेत असल्याचे दिसून येत आहे...

तसेच दुसरीकडे मागील 2019 च्या निवडणुकीत भाजपने मोठी आश्वासन या मतदार संघात केली मात्र त्यांचे आमदार निवडून देखील आले परंतू दिलेल्या अनेक आश्वासनांचा विसर पडल्याने अनेक ठिकाणी मतदार संघात विकास कामांच्या नावाने नाराजीचे सूर उमटत असल्याचे समजते तर उबाठाकडून देखील उमेदवार आणि पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेचा प्रचार करत आहेत...

महाविकास आघाडीचे तसेच शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अतुल नंदकुमार म्हात्रे हे मतदारसंघात श्रमजीवी,कष्टकरी,शेतकरी जनतेच्या हितासाठी तसेच कार्यरत असलेल्या शेकापची भूमिका तसेच शाहू ,फुले,आंबेडकर,यांच्या विचारांचा पक्ष आहे. याआधी नेते जयंता भाई पाटील यांच्या मार्गद्शनाखाली विकासकामे केली... शिवाय पर्यटन, शैक्षणिक तसेच वैद्यकीय क्षेत्रात चांगली कामे करताना अनेक उपक्रम आणले... त्यामुळे गेली अनेक वर्षे या ठिकाणी शेकापचे उमेदवार माय बाप जनतेने निवडून दिले त्यामुळे मतदारसंघावरही पक्षाचा प्रभाव आहे आणि तो आता सुद्धादिसेल,असे मतदारसंघामध्ये बोललं जात आहे...

तर पेण मतदार संघात उमेदवार अतुल म्हात्रेंची प्रचारात जोरदार आघाडी,घरोघरी प्रचारफेरीत उत्स्पूर्त प्रतिसाद आणि वाढता पाठिंबा मतदार यांच्या कडून मिळत असल्याने महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचारात वाढताना दिसत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post