महाराष्ट्र वेदभुमी

किल्ले प्रतिकृती मधून साकारतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास


 प्रतिनिधी आवरे( शंकर पाटील ): साम्राज्य व स्वराज्य यात खूप मोठा फरक आहे साम्राज्य हे मुलं पत्नी किंवा वारसदार यासाठी उभारला जात आणि स्वराज्य हे रयतेसाठी उभारल जात स्वराज्यात  तसेच परस्त्रीला  महत्व असत जगाच्या इतिहासात 17 राजे जे श्रेष्ठ होऊन गेले त्यात आपला राजा हा श्रेष्ठ ठरत आहे अखंड महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास कालखंडापासून  छत्रपती शिवाजी महाराज यांचा कालखंड पाहिला तर ऐतिहासिक किल्ले  जे आहेत त्यांना अनन्यसाधारण महत्व आहे युद्ध जन्य परिस्थिती आणि किल्ल्याचे महत्व हे खूप मोलाचे असते मग तो किल्ला कोणत्याही प्रकारचा असो जलदुर्ग असो नाही इतर कोणत्याही प्रकारचा दुर्ग असो किल्ल्याची भौगोलिक परिस्थिती शत्रू पासून संरक्षण होय किल्ल्याची विविध अंगे म्हणजे प्रवेश द्वार , धान्याचे बाजार पेठ असेल धान्याचे  कोठार , पाणी साठा असेल देवालय किंवा माची , बाले किल्ला  सैन्य असेल किल्ल्या भोवतालीचा प्रदेश असेल अशी अनेक अंगे किल्ल्याला असतात छत्रपती शिवाजी राजांचा अखंड इतिहास सर्वाना समजून जावा म्हणून दिवाळी मध्ये किल्ले स्पर्धा आयोजित केल्या जातात चिमुकले स्पर्धक हे सर्व पण पणाला लावून या ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती ही साकारत असतात आणि जणू काही आपण बनविलेले किल्ले ही इतिहासाची साक्ष देत सारडे विकास मंच आयोजित किल्ले स्पर्धेत सहभागी घेत आवरे गावातील कुमारी अक्षा उत्तम गावंड हिने ऐतिहासिक जलदुर्ग  मालवण किल्ला हा बनविला लहानपणा पासून तिला या गोष्टीची आवड असल्याने तिने अश्या प्रकारची प्रतिकृती तयार केली...

Post a Comment

Previous Post Next Post