महाराष्ट्र वेदभुमी

कातळपाडा - सातिर्जे येथील गणेश चंद्रकांत खडपे यांचे निधन



सोगाव - अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील कातळपाडा - सातिर्जे येथील गणेश चंद्रकांत खडपे यांचे सोमवार दि.४ नोव्हेंबर रोजी कांदिवली - मुंबई येथील आपल्या मुलाच्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कातळपाडा येथील मूळगावी करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी व  अंत्ययात्रेत पंचक्रोशीतील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनाबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे...

            त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक सून, नात आदी परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी बुधवार दि. १३ नोव्हेंबर रोजी होणार आहेत तर तेरावे शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी कातळपाडा येथील घरी होणार आहेत. कोणत्याही प्रकारचा दुखवटा स्वीकारला जाणार नाही असे त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post