महाराष्ट्र वेदभुमी

राजाभाऊ ठाकूर यांच्या प्रचाराला अभूतपूर्व प्रतिसाद.

 


माणगाव :-  (नरेश पाटील) 

रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे वजनदार नेते म्हणून सुपरिचित असलेले तथा १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून "लिफाफा" या प्रेमाचे आहेर म्हणून ओळखल्या जाणारे 'पाकीट चिन्हावर' निवडणूक लढत असलेले उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांनी आपल्या  झंजावती प्रचार, प्रसार दौऱ्याला सुरूवात केली आहे...म्हसळा तालुक्यातील आंबेत,संदेरी,संदेरी मोहल्ला , लीपने वावे, पांगळोली, तोराडी, कोल्हे, काळींजे तसेच श्रीवर्धन तालुक्यातील आरावी आणि चिखलप येथे  मंगळवार दि. ०५ नोव्हेंबर रोजी मतदार बंधू भगिनी यांची भेट घेतली...

राजाभाऊ ठाकूर हे प्रचाराकरीता आपल्या भागात आल्याची बातमी कळताच मतदारांनी मतदारसंघात तोंडी प्रचार करण्यास सुरुवात केली...स्थानिक मतदारसंघात जनता प्रचार  करू लागल्याने युवा पिढी, तरूण वर्ग आणि ज्येष्ठ नागरीक राजाभाऊ ठाकूर यांना पाहण्यास व भेटण्यास थेट रस्त्यावर येत होते... 

स्वर्गीय बॅरिस्टर अंतुले यांच्या बालेकिल्ल्यात मधूकर ठाकुर यांचे चिरंजीव राजेंद्र मधूकर ठाकुर उर्फ राजाभाऊ यांना लोकांनी निवडणुकीसाठी लाख लाख शुभेच्छा दिल्या... तुम्हाला आमचे आमदार केल्याशिवाय राहणार नाही... असे वक्तव्य करत गावातील मतदारांनी राजाभाऊच्या विजयाचा आनंद व्यक्त केला...     

यावेळी राजाभाऊ ठाकूर यांच्यासोबत जिल्हा काँग्रेस सचिव डॉ. नरेंद्र सिंह, माणगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास सुर्वे, संदेरी मोहल्ला येथील काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक फारुख परकार, श्रीवर्धन ता. येथील काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा कोकण मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष इम्तियाज कोकाटे, सचिव गणपत गमरे यांच्या सह  दिनेश खैरे, प्रसाद चापे आधी मोठ्या संख्येने काँग्रेस समर्थक उपस्थित होते....

Post a Comment

Previous Post Next Post