महाराष्ट्र वेदभुमी

महिला,शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा; शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंकडून वचननामा जाहीर

मुंबई(प्रतिनिधी)

 राज्यातील महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा मुंबईतील बीकेसी येथे काल पार पडली असून महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस नेते राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना युबीटी पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून महिलांना मोफत बससेवा देण्यात येणार आहे. तर, लाडक्या बहि‍णींना ३००० रुपये दरमहा देण्यात येतील. त्याचदरम्यान, शिवसेना (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी आपला वचननामा जाहीर केला आहे. या वचननाम्यात पाच ते सहा मुद्दे देण्यात आले आहेत...

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपला वचननामा जाहीर केला, ते म्हणाले की, ''आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत महापालिका, महानगरपालिका, विधानसभा किंवा लोकसभा असेल. आम्ही बरीच वर्ष युतीमध्ये होतो. त्याच्यानंतर पाच वर्षांपासून आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. प्रत्येक निवडणुकीमध्ये युती असो किंवा आघाडी असो हा जाहीरनामा प्रसिद्ध होत असतो. पण शिवसेना हा पक्ष आघाडीमध्ये सामील असला तरी या पक्षाची एक स्वतंत्र वचनबद्धता आहे. मी मुद्दाम आठवण करु देऊ इच्छितो, की २०१२ च्या निवडणुकीत शिवसेनेने वचननामा जाहीर केला होता, आणि त्यातील वचन देखील पक्षाने पूर्ण केले होते. याचा मला अभिमान आहे'', असं उद्धव ठाकरे म्हणाले...

महाविकास आघाडीचा जाहीरनामा याच्याबाबत आम्ही पूर्णपणे सहमत आहोतच. पण शिवसेना म्हणून मला असं वाटतं की, आमचं देखील काही कर्तव्य आहे. काही गोष्टी बारीक-सारीक असतात, ते ढोबळपणाने मांडता येत नाहीत. आजचा जो वचननामा आहे तो तुमच्या साक्षीने महाराष्ट्रासमोर सादर करत आहे. हा वचननामा दोन स्वरुपात असेल. पहिला म्हणजे खिशात मावेल असा तो असेल. दुसरा म्हणजे पंचसुत्री असेल. खिशात मावेल अशी पाच ते दहा वचनं त्यात आहेत. त्यावर क्यूआर कोड दिलेला आहे. तो स्कॅन केल्यानंतर तो वचननामा संपूर्णपणे वाचता येईल'', असं देखील ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं...

Post a Comment

Previous Post Next Post