अलिबाग(सचिन पाटील)
अलिबाग तालुक्यातील वाघोली येथील अमित वाघपंजे (वय वर्षे 33) हा दि. 31 आक्टोबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार पोयनाड पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे..
अमित वाघपंजे 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता घरातून बाहेर पडला तो आलाच नाही त्याच्या कुटुंबीयांनी त्याची सर्वत्र शोधशोध केली असता तो सापडला नाही.. शेवटी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोयनाड पोलीस स्टेशनला केली.. अमित वाघपंजे उंची 5 फूट 11 इंच, सडपातळ शरीराबांधा आहे घरून निघाला तेव्हा निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, हिरवा शर्ट घालुन बजाज डिस्कवर लाल रंगाची बाईक MH06 4938 ही गाडी घेऊन गेला आहे.. अशी व्यक्ती कोणाला दिसल्यास 7620149879/ 9850522083 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे..
