महाराष्ट्र वेदभुमी

ढोल-ताशांचा गजर अन्‌ ‘जय श्रीराम’चा जयघोष ..!


 सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक : कार्तिक महिन्यातील काकड़ा आरती निमित्य रामटेक गडमंदिर येथे १० नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० शिवमुद्रा  ढोल तासा नागपुर तर्फे गजर  करण्यात आला। आयोजन काकडा आरती भक्त परिवार तर्फे केल्या गेले. बटाटा पोह्यांचा नाश्ता  शिव संस्कृति  मित्र मंडळचे शंतनु सावरकर, हर्ष मारगंमवार, यश  धुळे, सुधांशू चौरसिया, प्रणय बिसने, राहुल सोलंकी  सहित आदी तर्फे करण्यात आले. काकडा आरती भक्त परीवारच्या वतीने शहरातील विठ्ठल मंदिरातुन गेल्या ३० वर्षांपासून कार्तिक महिन्यात पायी दिंडी काढण्यात येते. या पदयात्रा दिंडीत प्रकाश कस्तुरे, प्रभाकर महाजन, राजेंद्र गोलार, मारोती ठाकरे, अरुण भिलकर, राजेंद्र कडव, बोत्रे आदींचा समावेश आहे. भक्त परिवाराकडून दररोज काकडा आरतीच्या प्रसादाची व्यवस्था  केली जाते...

ढोल तासा पथकाने भगवान रामाच्या नावाने गजर केला . या पथकात १०० हून अधिक तरुण-तरुणी, महिला व लहान मुले सहभागी झाली होती...

ढोल तासा पथकाचे संचालक अजिंक समर्थ व अमित पांडे म्हणाले की नागपुर वरुण येऊन व वजनी ढोल गड मंदिर वर चढ़वने व सकाळी ५.३० वादन करने सोपे नाही. या करिता रात्र जगून कढावी  लगते. परंतु प्रभु नावाने व भक्ताच्या उपस्तितिने सहज झाले. श्रीराम गड मंदिरात ढोल तासा वाजवण्याचा आनंद वेगळाच आहे.  यावेळी उपविभागीय अधिकारी तथा श्री राम गडमंदिराचे रिसीव्हर प्रियेश महाजन यांचे सहकार्य लाभले. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी राम रथयात्रा शहरात निघेल व गडमन्दिर येते  रात्री १२ वाजता टीपुर जाळुन त्रिपुरी पौर्णिमेची सांगता होईल...

Post a Comment

Previous Post Next Post