उरण दि २६(विठ्ठल ममताबादे )
समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेचा उरण येथे पोलारिस लॉजिस्टिक्स पार्क कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या बिपिन मरीन या सर्व्हेअर कंपनीसोबत करार नुकताच संपन्न झाला. संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते अतुल परशुराम भगत यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच बिपिन मरीन तर्फे भूषण हांडे साहेब यांनी स्वाक्षऱ्या केल्या याप्रसंगी पोलारिस लॉजिस्टिक्स पार्क कंपनी प्रशासनातर्फे अरुप घोष, सागर म्हात्रे आदी उपस्थित होते. तसेच कामगार संघटनेतर्फे अजय पाटील, नैनेश म्हात्रे तसेच कामगार प्रतिनिधी म्हणून राकेश भोईर, तुषार पाटील, शक्ती भोईर, निलेश मोडखळकर, लकेश ठाकूर, विशाल ठाकूर, अभिजीत घरत, सुलक्षण ठाकूर तसेच बिपिन मरीन सर्व्हिसेस तर्फे भूषण हांडे, अक्षय ठाकूर उपस्थित होते ...
याप्रसंगी बोलताना अतुल भगत यांनी सांगितले की केंद्रीय कामगार कायद्याप्रमाणे वेतन तसेच कामगारांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी चांगली वैद्यकीय सुविधा या प्रमुख मागण्या आम्ही या करारामध्ये कंपनीकडून मागून घेण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. या करारानुसार तीन वर्षासाठी ९२०० रुपयांची भरगोस वेतन वाढ तसेच ESIC व्यतिरिक्त प्रत्येक कामगारांना वैद्यकीय मदत म्हणून ५०००, ५५००, ६००० रुपये पुढील तीन वर्षात मिळणार आहेत. भेंडखळ येथे ग्राम विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दिलेला शब्द या करारावेळी मी पुरा करू शकलो याचा सर्वाधिक आनंद मला होत आहे. यावेळी कामगार प्रतिनिधींचे मिळालेले सहकार्य तसेच सर्व कामगारांचा संघटनेवर असलेला विश्वास यामुळेच हा करार संपन्न होऊ शकला. या पुढील होणारे करार होण्यासाठी सदर झालेला करार महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ मंडळ भेंडखळ, ग्रामविकास आघाडी भेंडखळ तसेच सर्व कामगार प्रतिनिधी, कामगार यांचे या प्रसंगी आभार मानत आहोत...