महाराष्ट्र वेदभुमी

भिवंडीत अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके


मुलुंड प्रतिनीधी ( सतिश पाटील) : दिनांक २६\११\२०२४ भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके; सरवली पाडा, टेमघर पाडा, सोनाळे, भादवड इत्यादी गावात दोन ते तीन सेकंद कंपन..

मोठी बातमी! 

भिवंडीत अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके

भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याची माहिती आहे... सरवली पाडा, टेमघर पाडा, सोनाळे, भादवड इत्यादी गावात दोन ते तीन सेकंद कंपन जाणवले, अशी माहिती मिळत आहे... जमीन हादरल्याचे झटके जाणवल्याने गावातील नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. कंपन नक्की कशाचे होते हे अजून स्पष्ट नसल्याची माहिती तहसीलदार अभिजित खोल यांनी दिली आहे... याबाबत हैदराबाद येथे रिपोर्ट पाठवून माहिती घेणार, असं तहसीलदरांनी सांगितलं आहे... संबंधित गावात महसूल प्रशासनाचे कर्मचारी दाखल झाले आहेत...

विशेष म्हणजे फक्त भिवंडीच नाही तर गुजरातच्या सौराष्ट्र क्षेत्रातही २६ ला संध्याकाळी भूकंपाचे झटक जाणवले आहेत... आयएसआरच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल इतकी होती... दरम्यान, तिथल्या गिर सोमनाथ जिल्हा प्रशासनाकडे भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जैविक किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप आलेली नाही... आयएसआरच्या अंदाजानुसार, दि २६ ला संध्याकाळी ६:०८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post