महाराष्ट्र वेदभुमी

रामटेक विधानसभेसाठी ३५९ मतदान पथके

मतदानासाठी सज्ज

रामटेक : महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला होणाऱ्या रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ३५९ पोलिंग पार्ट्याचे १४७६ कर्मचारी आणि ३५९ पोलीस कर्मचारी रवाना झाले... संस्कृत विदयापीठ मधे तयार केलेल्या डोममधून  पोलिंग पार्टी यानां साहित्य वाटप करण्यात आले... ३६ अतिरिक्त पोलिंग पार्टी तयार ठेवण्यात आल्या...

 रामटेक विधानसभेत १४२२३१ पुरुष मतदार , १४१३०७ महिला मतदार इतर ३७३ असे एकूण २८३९११ मतदार आहेत...   निवडणूक निर्णय अधिकारी प्रियेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक  अधिकारी तथा तहसीलदार रमेश कोळपे, अतिरिक्त तहसीलदार पूनम कदम, नायब तहसीलदार महेश कुलदीवार, मुकुंद भुरे, भोजराज बडवाईक, सारिका धात्रक, रमेश पागोटे यांच्यासह २५० अधिकारी कार्यरत आहेत... उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, ठानेदार आसाराम शेटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post