उरण – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदार जनजागृती करण्यासाठी शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुलामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते... देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे...मतदान हे केवळ नागरी कर्तव्य नाही तर हा लोकशाहीचा पाया आहे जो नागरिकांना त्यांच्या राष्ट्राची दिशा ठरवण्याचा अधिकार देतो हा एक मूलभूत अधिकार आहे..हे पटवून देण्यासाठी आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने स्वीप हा उपक्रम हाती घेतला आहे... या उपक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, सायकल रॅली आणि मानवी साखळी इत्यादि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते...यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला... कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष ठाकूर, शिवहरी गावंड देवेश म्हात्रे, शेखर म्हात्रे, रुपेश म्हात्रे, हिमांशु पटेल, प्रविण चिरलेकर, संगीता म्हात्रे, निवास गावंड, सविता आवटे, सत्यवान म्हात्रे, सुनील जानकर यांनी विशेष परिश्रम घेतले..
