अब्दुल सोगावकर : अलिबाग
सोगाव : अलिबाग तालुक्यातील बहिरोळे येथील मतदान केंद्रावर सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत दर दोन तासांनी झालेली मतदानाची आकडेवारी घेण्यास गेलेल्या पत्रकारांना मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे... याबाबत आम्हाला वरिष्ठांकडून पत्रकारांना कोणतीही माहिती देण्यात मनाई करण्यात आली असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले...
याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी निवडणूक अधिकारी श्री. खरात व अलिबाग तहसीलदार यांना सकाळी साडे अकराच्या सुमारास संपर्क साधला असता त्यांनी आम्ही महत्वाच्या मिटिंग मध्ये व्यस्त असल्याने थोड्याच वेळात सांगतो, असे सांगितले, मात्र दुपारी साडे चार वाजेपर्यंत तरी कोणतीही प्रतिक्रिया अथवा कोणताही प्रतिसाद त्यांनी दिला नाही... यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात पत्रकारांनी संताप व्यक्त केला आहे...
