उरण/ १८ नोव्हें.(रणिता ठाकूर) : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आत्ताच्या पिढीला जाण व्हावी, त्यांनी स्वराज्यासाठी जे मोलाचे योगदान केले. लहान मुलांना त्यातून प्रेरणा मिळावी.त्याचबरोबर दिवाळीच्या मोठ्या सुट्टीत जास्त काळ इंटरनेट आणि गेमच्या दुनियेत वावरत असतात यातून बाहेर काढण्यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरणतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 'गडकिल्ले बनविणे' या संदर्भात स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा 17नोव्हेंबर 2024 रोजी उरण येथील कुलदीप सिंग यांच्या येथील वैष्णोदेवी मंदिराच्या प्रांगणात संपन्न झाला.
सदर बक्षीस वितरणाच्या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र ठाकूर सर यांनी केले. आणि कार्यक्रमाची सुरुवात गायक सोमनाथ पाटील यांच्या 'शिवरायांचे नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर' या गाण्याने झाली.किल्ले बनवणाऱ्या मावळ्यांचे कौतुक करण्यासाठी आलेल्या व्यासपीठावरील मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग सांगून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. आणि गडकिल्ले बनवणाऱ्या मावळ्यांबद्दल भरभरून कौतुक केले. त्याचबरोबर सदर स्पर्धा आयोजित केली त्या आयोजकांचे म्हणजेच दुर्गा मावळा प्रतिष्ठान उरण यांचेही आभार मानले.सदर स्पर्धेत किल्ला प्रतिकृती बनवणाऱ्या प्रथम क्रमांक पाटील ब्रदर्स-वेश्वी (प्रतापगड किल्ला) द्वितीय क्रमांक पटकावणारे उरण एज्युकेशन सोसायटी-(पुरंदर किल्ला) तृतीय क्रमांक जय हरी ग्रुप-बोरी (द्रोणागिरी किल्ला) सदर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाकरता प्रत्येकी सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, रोख रक्कम2000,
1500आणि 1000रुपये देण्यात आले, त्याचबरोबर 12 उत्तेजनार्थ तसेच सहभागी प्रत्येक प्रतिकृती साकार करणाऱ्या मावळ्यास प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठाला लाभलेले संजेश नरेंद्र थळी,.युट्युबर ,गिरीश पाटील सर-इतिहास अभ्यासक, सुमित संजय थले-अध्यक्ष आगरी कोळी कराडी सामाजिक संस्था .कुलदीप सिंग,ह .भ .प. रमेश यादव महाराज, महेश म्हात्रे -सामाजिक कार्यकर्ते.अजय म्हात्रे सरपंच चांजे ग्रामपंचायत, प्रमिला म्हात्रे चांजे ग्रा सदस्य, सोनाली ठाकूर चांजे ग्रा सदस्य, प्रसिद्ध युट्युबर गणेश कोळी, त्याचबरोबर दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष तेजश्री पाटील आणि मंडळाचे सर्व शिलेदार, तसेच उपस्थित शिवभक्त, पालक वर्ग, आणि गडकिल्ले स्पर्धेत सहभागी होणारे सर्व मावळे उपस्थित होते... सदर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि शिवगर्जना देत आनंदात पार पडला... व्यासपीठाला लाभलेल्या मान्यवरांचे तसेच स्पर्धेत सहभागी घेतलेल्या मावळ्यांचे आणि त्यांच्या पालक वर्गांचे आभार मंडळाच्या अध्यक्षा तेजश्री पाटील यांनी मानले...आणि सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...
