महाराष्ट्र वेदभुमी

भाजपा युवा मोर्चा तर्फे बैठक संपन्न.

 


उरण दि २४(विठ्ठल ममताबादे ): महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा साठी मतदान होणार असून महायुती तर्फे उरण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून महेश बालदी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते आता कामाला लागले आहेत.उरण तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे उरण पूर्व विभाग मध्ये चिरनेर, कळंबुसरे, मोठी जुई येथील बूथच्या ठिकाणी युवा मोर्चाची बैठक पार पडली..

 यावेळेस उरण तालुका युवा मोर्चा अध्यक्ष तेजस भाई, उरण तालुका सरचिटणीस रमेश(नाना) पाटील, उरण तालुका सचिव ॲड.साहिल हेमंत म्हात्रे, उरण तालुका सोशल मीडिया अध्यक्ष समीर पाटील,उरण पूर्व विभाग युवा मोर्चा अध्यक्ष प्रविण घासे, चिरनेर पंचायत गण अध्यक्ष सुशील पाटील उपस्थित होते. या वेळेस युवकांना व उपस्थितांना सर्व युवा नेत्यांनी संबोधीत केले व निवडणुकीत जास्तीत जास्त काम करण्यास प्रेरीत केले.या बैठकीस पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post