सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : रामटेक विधानसभा निवडणूक २०२४ करिता संस्कृत विद्यापीठात दोन दिवसीय निवडणूक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे... एसडीओ व निवडणूक निर्णय अधिकारी प्रियेश महाजन यांनी मोठ्या स्क्रीनवर पहिल्या दिवशी १९ ऑक्टोबर रोजी ८४६ निवडणूक कर्मचारि यानां दोन सत्रात व २० ऑक्टोबर रोजी तीन सत्रात १२७० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले... अशा एकूण २११६ कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले... या वेळी तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार महेश कुलदिवार, अतिरिक्त तहसीलदार पूनम कदम, नायब तहसीलदार भोजराज बडवाईक, नायब तहसीलदार मुकुंद भुरे, बीडीओ जयसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली १५० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी उपस्थित मतदान कर्मचाऱ्याना प्रशिक्षण दिले... निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली.,. सर्व नमुना फॉर्मची माहिती देण्यात आली... ईव्हीएमची कार्यपद्धती कर्मचाऱ्यांना वैयक्तिकरित्या समजावून सांगितली व त्यांना ईव्हीएम हाताळण्यास सांगितले गेले...निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेले कर्मचारी याना पोस्टल बॅलेट फॉर्म भरण्यास सांगण्यात आले...