सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- "वाघ आणि मानव दोन्ही जगले पाहिजे अशी भावना वन्यजीवप्रेमीची आहे. मानव आणि वन्यजीव संघर्ष मोठा प्रश्न आहे... व्याघ्र अधिवासामध्ये वाघांची संख्या वाढते आहे... त्यांच्याबरोबर वाघांच्या संचार मार्गाचे, व्याघ्र अधिवसाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे...
नागपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी रामटेक , पारशिवनी स्थानिक शेतकरी, आदिवासी लोकांवर, जंगलात चरायला गेलेले पाळीव प्राण्यासह गुराखी यांच्यावर वाघांच्या होत असलेल्या हल्ल्यांचे प्रमाण पाहता त्यावर उपाय योजना करण्यासाठी जंगलाचे बफर शेत्रातील गुराखी करीता अमलातास पर्यटक संकुल येथे कार्यशाळेचे आयोजन ( दि १०) गुरुवार रोजी करण्यात आले...यामध्ये २५ बफर गावातील १२३ गुराखी लोकनी सहभाग घेतला...कार्यक्रमचे प्रास्तविक मध्ये जयेश तायडे वनपरिशेत्रअधिकारी पवनी ए.नि.यांनी काही दिवसापुर्वी पेंच बफर व प्रादेशिक शेत्रात वाघांनी केलेल्या हल्ल्यामुळे काही लोकांचा मुत्यु झालेला असून त्यापैकी जास्त लोक हे गुराखी होते असे सांगितले...त्यामुळे गुराखी याच्यामधे जागरुकता होणे आवश्यक असून त्यातून स्वरक्षण व गावातील लोकांचे रक्षण या करिता गुराखी मोलाची भूमिका पार पडुन वनविभागाला मदत करू शकता अशी भावना व्यक्त केली...
सदर वेळी बनियान ट्री फाउंडेशन चे संचालक श्री मंदार सलाये हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते...संपूर्ण कार्यक्रमा मधे श्री संजय करकरे प्रोजेक्ट इंचार्ज बनियान ट्री फाउंडेशन यांनी ppt च्या माध्यमातुन गुराखी यांनी काय काळजी घ्यावी,काय करावे,कोणत्या उपाययोजना कराव्यात याबद्दल मार्गदर्शन केले....यावेळी गुराखी यांनी त्याच्या अडचणी सांगितल्या...त्याबाबत सुद्धा त्त्याना मार्गदर्शन करण्यात आले..गुराख्याना यावेळी टीशर्ट ,मुखवटे व त्यानी घ्यावयाची काळजी याचे पत्रक असे वाटप करण्यात आले...सदर कार्यक्रमाचे आयोजन हे डॉ प्रभुनाथ शुक्ला उपसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प व कू पूजा लिंबगांवकर याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले...
