महाराष्ट्र वेदभुमी

गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- तालुक्यातील राधाकृष्ण वार्ड येथील रहिवासी असलेले उद्योजकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.   ही घटना बुधवार (दि.९) सकाळी १० वाजताच्या दरम्यान उघडीस आली... याप्रकरणी रामटेक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे...

रामटेक शहरातील राधाकृष्णन वॉर्ड येथील रहिवासी उद्योजक नीरज नरेंद्र जैन वय ४५ वर्ष. यांनी स्वतःच्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील दरवाज्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला... १० वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी बोलवायला गेली असता घडलेला प्रकार लक्षात आला...तिने कुटुंबियांना आवाज दिला मात्र तोपर्यंत नीरज जैन यांची प्राणज्योत मालावली होती...

घटनेची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली...पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदन करिता उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठविले... मनमिळाऊ वृत्तीचे उद्योजक असणारे नीरज यांच्या मृत्यूने संपूर्ण रामटेक शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट असून पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post